मुंबई शहर मौर्य मेवरीक्स विरुद्ध पुणे पलानी टस्कर्स यांच्यात प्रमोशन फेरीच्या शेवटच्या दिवशी पहिला सामना झाला. मुंबई शहर गुणतालिकेत चौथ्या स्थानी होता तर पुणे संघ सहाव्या स्थानी होता. मुंबई शहर संघ हा सामना जिंकून टॉप 2 च्या शर्यतीत राहण्यासाठी प्रयत्न करणार होते. मुंबई शहराच्या रुपेश साळुंखे व शार्दूल पाटील ने चढाईत व पकडीत गुण मिळवत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पुढील काही मिनिटाचं मुंबई शहर ने पुणे संघावर लोन पाडत आघाडी मिळवली.
मध्यांतरा आधी पुणे संघाने मुंबई शहर संघाला ऑल आऊट करत सामन्यात चुरस आणली. मध्यांतरला मुंबई शहर कडे 23-16 अशी आघाडी होती. मध्यांतरा नंतरही मुंबई शहर ने चपळाई दाखवत गुण मिळवत आघाडी वाढवली. त्यानंतर पुणे संघाने चांगला प्रतिकार करत सामन्यात चुरस वाढवली होती. 23-40 च्या पिछाडी वरून 39-45 असा अखेर पुणे संघाला पराभव स्वीकारावा लागला.
मुंबई शहर कडून शार्दूल पाटील ने 14 गुण मिळवले, त्याना जतिन विंदे चांगली साथ दिली. तर पकडीत हर्ष लाड ने 4 पकडी व ओमकार येनपुरे ने 3 पकडी केल्या. पुणे कडून आर्यन राठोड ने 8 गुण मिळवले तर अनुज गावडे ने 4 पकडी केल्या. या विजयाने मुंबई शहर संघ दुसऱ्या स्थानावर पोहचला परंतु हे स्थान निश्चित होण्यासाठी नांदेड व कोल्हापूर संघांनी आपले शेवटचे सामने गमावले तरच मुंबई शहर ची दुसऱ्या स्थानी जागा निश्चित होईल. (Fourth win for Mumbai City Maurya Mavericks in the promotion round)
बेस्ट रेडर- शार्दूल पाटील, मुंबई शहर मौर्य मेवरीक्स
बेस्ट डिफेंडर- अनुज गावडे, पुणे पलानी टस्कर्स
कबड्डी का कमाल- जतिन विंदे, मुंबई शहर मौर्य मेवरीक्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केकेआरने पुन्हा उडवला आरसीबीचा खुर्दा! घरच्या मैदानावर विराट सेनेचा पराभव
के.एम.पी. युवा कबड्डी सिरीज च्या अंतिम फेरी पर्यंतचा असा असेल प्रवास