प्रथमच आयोजित होत असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग (WPL 2023) स्पर्धेचा पहिला हंगामा सुरू होण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. महिला क्रिकेटमधील क्रांतिकारी स्पर्धा मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी सबंध क्रिकेटविश्व उत्सुक दिसून येते. त्याचवेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या स्पर्धेच्या प्रसिद्धीसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयकडून स्पर्धेला दोन दिवसांचा अवधी शिल्लक असतानाच एक मोठी घोषणा केली गेली. या लीगमध्ये सामने पाहण्यासाठी मुली व महिला यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. तर, तिकिटांची किंमत देखील केवळ 100 व 400 इतकीच ठेवण्यात आलीये. महिला क्रिकेट बाबत जागृती होण्यासाठी व स्पर्धेची प्रसिद्धी करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.
वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामाला 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने मुंबई येथील ब्रेबॉर्न स्टेडियम व डॉ. डी.वाय पाटील स्टेडियम या ठिकाणी होतील. या स्पर्धेत पाच संघ खेळताना दिसणार आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) ही करेल. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे कर्णधारपद भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) ही भूषवेल. लीगमध्ये केवळ याच दोघी भारतीय कर्णधार असणार आहेत.
वुमेन्स प्रीमिअर लीग स्पर्धेसाठी बीसीसीआय जोरदार तयारी केली होती. बोर्डाने 5 संघांच्या लिलावातून तब्बल 4669 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच, यानंतर मीडिया हक्कातून 951 कोटी रुपयेदेखील कमावले आहेत. यामुळे महिला प्रीमिअर लीग ही आयपीएलनंतर जगातील दुसरी सर्वात मोठी टी20 लीग बनली आहे. खेळाडूंच्या लिलावात देखील अनेक खेळाडूंना कोट्यावधींची बोली लागली. स्मृती मंधाना ही 3 कोटी 40 लाख रक्कम घेत सर्वात महागडी खेळाडू ठरली होती.
(Free Entry For Girls And Ladies In WPL 2023 Ticket Price Only 100 BCCI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: लग्नाच्या बेडीत अडकलेल्या शार्दुलचा पत्नीसाठी झक्कास उखाणा; म्हणाला, ‘बॉलिंग करतो क्वीक…’
थेट ‘सिक्सर किंग’ युवीला पछाडत उमेश ‘स्पेशल’ यादीत! रवी शास्त्रींचा पराक्रमही ध्वस्त