कोरोना विषाणूमुळे क्रिकेटच जग थांबल होत. त्यामळे आयपीएल स्पर्धाही स्थागित करण्यात आली होती. परंतु अखेर आयपीएल २०२० स्पर्धा १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होईल. युवा खेळाडूंसाठी आयपीएल हे एक चांगले व्यासपीठ आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक युवा खेळाडूंनी आपली कारकीर्द उजळवली. आयपीएल २०२० मध्येही काही युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळेल, परंतु ते पदार्पणात कशी कामगिरी करून दाखवतील याकडे सर्वांचे लक्ष असेल.
या लेखात त्या १० खेळाडूंची नावे आहेत जे आयपीएल २०२० च्या माध्यमातून आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतात.
१. यशस्वी जयस्वाल (Yashvi Jaiswal)
यशस्वी जयस्वालने १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या ६ सामन्यात १३३.३ च्या जबरदस्त सरासरीने एकूण ४०० धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट ८२.४७ होता. या स्पर्धेत त्याने एकूण ४ अर्धशतके आणि १ शतक झळकावले होते. विजय हजारे वनडे स्पर्धेत त्याने दुहेरी शतकही केले आहे.
त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल २०२० च्या लिलावात त्याला खरेदी केले. यशस्वी जयस्वाल राजस्थान रॉयल्सच्या संघासाठी सलामी फलंदाज म्हणून सुरुवात करू शकतो.
२. टॉम बंटन (Tom Bunton)
इंग्लंडमधील टॉम बंटन हा एक नवोदित युवा सलामीवीर आहे, ज्याने टी-२० ब्लास्टमध्ये शानदार फलंदाजी करून सर्वांची मने जिंकली. तो सॉमरसेटकडून खेळत असताना टी-२० ब्लास्ट २०१९ मध्ये ४२.२३ च्या सरासरीने ५४९ धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा १६१.४७ असा चांगला स्ट्राइक रेट होता. तसेच तो यष्टिरक्षणही उत्तम करतो.
त्याच्या या जबरदस्त कामगिरीमुळेच त्याला इंग्लंडच्या टी-२० संघात न्यूझीलंडविरूद्ध संधी मिळाली. त्याने ३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आणि यावेळी त्याने संघासाठी एकूण ५६ धावा केल्या.
अबू धाबी येथे खेळल्या गेलेल्या टी१० लीगमध्येही बंटनने चांगली कामगिरी केली. तिथे त्याने ५ सामन्यात ४०.८० च्या सरासरीने आणि २०० च्या स्ट्राइक रेटने १६२ धावा केल्या. इंग्लंडच्या या खेळाडूचे भविष्य नक्कीच खूप चांगले आहे. हा खेळाडू आयपीएल २०२० मध्ये केकेआरकडून पदार्पण करेल.
३. रवी बिश्नोई (Ravi Bishnoi)
आयपीएल २०२० साठी युवा खेळाडू रवी बिश्नोईला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने विकत घेतले आहे. रवीचा हा आयपीएलचा पहिला हंगाम असेल. त्याला हा त्याचा आयपीएलचा पहिला हंगाम नक्कीच संस्मरणीय बनवायचा असेल. १९ वर्षांखालील विश्वचषकात रवी बिश्नोईने शानदार गोलंदाजी केली. आयपीएल २०२० मध्येही ती लय कायम नक्की ठेवेल, अशी अपेक्षा आहे.
रवी बिश्नोई एक मिस्ट्री स्पिनर आहे आणि त्याच्याकडे असणाऱ्या जादुई फिरकीमध्ये मोठ्या फलंदाजांना चकवण्याची क्षमता आहे.
४. शेल्डन कॉटरल (Sheldon Cottrell)
किंग्ज इलेव्हन पंजाबने वेस्ट इंडिजचा जबरदस्त वेगवान गोलंदाज शेल्डन कॉटरलला ८.५ कोटींच्या मोठ्या किंमतीत खरेदी केले आहे. लिलाव होण्यापूर्वी अशी चर्चा होती की कॉटरलला मोठी रक्कम मिळणार आहे आणि असेच काहीसे घडले. गेल्या काही वर्षांत कॉटरलची कामगिरी उत्कृष्ट होत आहे. पंजाबमध्ये परदेशी गोलंदाजांची कमतरता होती आणि त्यांची ही कमी कॉटरलने भरुन काढली आहे.
कॉटरलने सीपीएलमध्ये चमकदार गोलंदाजी केली आणि त्याने 8 सामन्यात १२ बळी घेतले. शेल्डन मोहम्मद शमीसह पंजाबसाठी जबरदस्त कामगिरी करू शकतो. वेस्ट इंडीजच्या या खेळाडूने त्यांच्या या पहिल्या आयपीएलमध्ये पंजाब संघासाठी जबरदस्त कामगिरी करावी अशी चाहत्यांची नक्कीच इच्छा असेल.
५. ईशान पोरेल (Ishan Porel)
या मोसमातील रणजी करंडक स्पर्धेत बंगाल संघाने अंतिम फेरी गाठली. यात ईशान पोरेलनेही मोलाचे योगदान दिले. या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली. या युवा गोलंदाजाला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने आयपीएल २०२० च्या लिलावात २० लाखांच्या किंमतीत खरेदी केले. त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा संघाला असेल.
ईशान पोरेल आयपीएल २०२० मध्ये चांगली कामगिरी करत निवडकांचे लक्ष वेधून घेऊ शकतो. ईशान हा असा खेळाडू आहे ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे.
६. अॅलेक्स कॅरी (Alex Carey)
ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरीने विश्वचषक २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून शानदार कामगिरी केली होती. दिल्ली कॅपिटलमध्ये चांगल्या भारतीय फलंदाजांचा पर्याय होता, परंतु अॅलेक्स कॅरीच्या समावेशामुळे परदेशी खेळाडूंचाही चांगला पर्याय मिळाला आहे.
यष्टीरक्षक फलंदाज अलेक्स कॅरी खालच्या फळीमध्ये दिल्ली कॅपिटलसाठी मॅच फिनिशरची भूमिका बजावू शकतो. जर रीषभ पंत कोणत्याही कारणास्तव खेळत नसेल तर तो यष्टीरक्षक म्हणून संघासाठीदेखील खेळू शकतो. या मोसमात तो दिल्लीचा महत्त्वाचा खेळाडू असल्याचे सिद्ध होऊ शकतो.
७. तुषार देशपांडे (Tushar Deshpande)
तुषार देशपांडे हा मुंबईचा वेगवान गोलंदाज आहे. गेली २-३ वर्षे तो मुंबई संघासाठी रणजी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे या वेगवान गोलंदाजाला दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या संघात सामील करुन घेतले आहे.
यावेळी दिल्लीच्या अंतिम अकरामध्ये त्याला स्थान मिळू शकते.
तुषार देशपांडेची खास गोष्ट म्हणजे तो वेगवान गोलंदाजी करतो. त्याच्या वेगवान गोलंदाजीमध्ये मोठ्या फलंदाजांना चकवण्याची क्षमता त्याच्यात आहे. आयपीएलचा हा त्याचा पहिला हंगाम असेल.
८. जोशुआ फिलिप (Joshua Philip)
ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज जोशुआ फिलिपने बिग-बॅश लीगमध्ये आपल्या फलंदाजीची क्षमता दर्शविली आहे. या वेळी बिग बॅश लीगमध्ये जोशुआ फिलिपने १६ सामन्यांत ४८७ धावा केल्या आहेत, तर आयपीएलमध्ये आरसीबीने त्याला सलामीवीर म्हणून आपल्या संघात घेतलं आहे.
जोशुआ फिलिप आयपीएल २०२० च्या माध्यमातून आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतो. या मोसमात तो आरसीबीसाठी यष्टीरक्षक म्हणूनही काम करू शकतो. तसेच तो संघाला आक्रमक सुरुवात करुन देण्यास सक्षम आहे.
९. देवदत्त पेडिकक्कल (Devdutt Pedikakkal)
युवा फलंदाज देवदत्त पाडिकक्कल देशांतर्गत सामन्यांत २०१९-२० मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये होता. पहिल्या विजय हजारे वनडे स्पर्धेत त्याने शानदार खेळ दाखविला होता. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही तो उत्तम खेळाला.
विजय हजारे वनडे स्पर्धेतही देवदत्त पेडिकक्कल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. विजय हजारे वनडे स्पर्धेच्या ११ सामन्यात ६७.६६ च्या उत्कृष्ठ सरासरीने त्याने एकूण ६०९ धावा केल्या. त्यात त्याने २ शतके आणि ५ अर्धशतकेही केली. तसेच स्पर्धेत सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही त्याच्या फलंदाजीतून सर्वाधिक धावा निघाल्या.
आयपीएल २०१९ मध्ये त्याला आरसीबीकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही, परंतु आयपीएल २०२० मध्ये तो आरसीबीकडून पदार्पण करू शकेल.
१०. इसुरु उड़ाना (Isuru Udana)
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू इसुरु उड़ानाला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने ५० लाख रुपयांत संघामध्ये सामील केलं आहे. इसरुने अद्याप एकाही आयपीएल सामना खेळलेला नाही आयपीएल २०२० हा त्याचा आयपीएलचा पहिलाच हंगाम असेल.
श्रीलंकेचा हा तरुण खेळाडू आरसीबीसाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. परंतु, या संघात आधीच ख्रिस मॉरिससारखा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहे. २००९ पासून अष्टपैलू इसुरु उडानाने श्रीलंकेच्या संघासाठी १८ वनडे आणि ३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल इतिहासात एकदाही विजेता ठरला नाही ‘हा’ संघ, यंदा या ४ कारणांमुळे होऊ शकतो विजेता
आयपीएल २०२०: युएईच्या मैदानावर ‘हे’ ५ स्पिनर दाखवू शकतात कमाल, ३ भारतीयांचा समावेश
महत्त्वाच्या बातम्या –
शोएब अख्तरने धोनीला जाणून बुजून टाकलेल्या त्या बीमरचा आजही होतोय पश्चाताप
विराट कोहलीच्या लग्नात झाली होती धोनीच्या रिटायरमेंटवर चर्चा
आयपीएल इतिहासातील सर्वात मोठे वाद; यांपैकी किती वाद तुम्हाला आठवतात?