बॅलेन दोर पुरस्कारासाठी नामांकित ३० फुटबाॅल प्लेयर्सची घोषणा आज झाली. मागील ९ वर्षांपासुन यावर दबदबा असलेल्या लियोनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो बरोबर नेमार ज्युनियरने सुद्धा आपली दावेदारी मजबुत केली आहे.
सलग दोन वर्ष चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या रियल मद्रिदच्या खळाडूंचा या पुरस्काराच्या यादीत दबदबा कायम राहिला आहे. रोनाल्डो बरोबर बेन्झीमा, इस्को, रॅमॉस, मार्सेलो, माॅड्रीक, क्रुस अश्या ७ फुटबॉलपटुंचा या यादीत समावेश आहे. बार्सिलोना संघातील मेस्सी आणि लुईस सुआरेझ बरोबरच पॅरिस सेंट जर्मेन संघाचा नवीन खेळाडू नेमार जुनियर, मबाप्पे आणि कवानी यांचा देखील या यादीत समावेश आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा उपविजेता संघ जुवेंटस संघातील खेळाडू पाउलो डिबाला आणि गोलकीपर बुफाॅन हे देखील या यादीत सामील झाले आहेत. तर मागील वर्षी या पुरस्स्काराच्या शर्यतीत नंबर ३ वर असलेला अथलेटिको माद्रिदचा अन्टेनिओ ग्रिझमन देखील पुन्हा या शर्यतीत आहे.
२००७ मध्ये ब्राझीलियन खेळाडू काका याने बॅलेन दोर पुरास्कार मिळवाल होता. त्यानंतर या पुरस्कारात लियोनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा दबदबा राहिला आहे. बॅलेन दोर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या सर्व ३० खेळाडूंच्या यादीचे ट्विट.
The 30 nominees for the 2017 Ballon d'Or France Football ! #ballondor pic.twitter.com/TBRQwRvo4E
— Ballon d'Or (@ballondor) October 9, 2017
काय आहे बॅलेन दोर
# हा पुरस्कार १९५६ पासुन वर्षातील सर्वोत्तम फुटबाॅलरला दिला जातो.
# आधी हा पुरस्कार फीफाच्या वर्ल्ड प्लेयर ऑफ दी इयर पासुन वेगळा होता पण २०१० साली दोन्ही पुरस्कार एकत्र करुन ‘फिफा बॅलन दोर’ झाला.
# हे केवळ ५ वर्ष टिकले आणि २०१६ पासून परत बॅलेन दोर पुरस्कार फीफा पासून विभक्त झाले.
# वर्ल्ड गव्हर्निंग बॉडीने ‘दी बेस्ट’ या पुरस्काराची घोषणा केली.
नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)