---Advertisement---

आयसीसी महिला विश्वचषक २०२१ चे वेळापत्रक जाहीर

---Advertisement---

आयसीसीने आज(११ मार्च) २०२१ ला होणाऱ्या महिला वनडे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. हा विश्वचषक न्यूझीलंड येथे ६ फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान होईल.

या स्पर्धेत ८ संघ सहभागी होणार आहेत. त्यात गतविजेते इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, यजमान न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. तर अन्य ४ संघांचा समावेश महिला चॅम्पियनशीप आणि जूलैमध्ये श्रीलंकेत पार पडणाऱ्या विश्वचषक पात्रता फेरीनंतर होईल.

पुढीलवर्षी ६ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या या विश्वचषकात ३० दिवसात ३१ सामने होणार आहे. हे सामने न्यूझीलंडमधील ऑकलंड, हॅमिल्टन, तौरंगा, वेलिंग्टन, ख्राईस्टचर्च आणि डूनडीन या ६ ठिकाणी होणार आहेत.

तसेच तौरंगा आणि हॅमिल्टनला अनुक्रमे ३ आणि ४ मार्चला उपांत्य सामने होतील. तर ७ मार्चला ख्राईस्टचर्च येथे अंतिम सामना पार पडेल. या विश्वचषकातील उपांत्य सामन्यांसाठी आणि अंतिम सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे.

Photo Courtesy: Twitter/ cricketworldcup

नुकत्याच पार पडलेल्या महिला टी२० विश्वचषकादरम्यान भारत विरुद्ध इंग्लंड संघातील उपांत्य सामना पावसाच्या व्यत्ययामुळे आणि राखीव दिवस नसल्याने रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आयसीसीच्या नियमानुसार अ गटात अव्वल क्रमांक मिळवणाऱ्या भारतीय संघाने थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.

पण यामुळे आयसीसीच्या नियमावर बरीच टीका झाली होती. तसेच राखीव दिवस ठेवण्यात यावा असेही सुचवण्यात आले होते. अखेर आयसीसीने वनडे विश्वचषकातील उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे.

पुढीलवर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी ५.५ मिलियन डॉलर्स इतकी बक्षीस रक्कम आहे. याआधी २०१७ ला पार पडलेल्या महिला वनडे विश्वचषकासाठी ३.१ मिलियन डॉलर्स इतकी बक्षीस रक्कम होती.

या विश्वचषकात सहभागी होणारे ८ संघ राऊंड रॉबिन पद्धतीने सामने खेळतील. म्हणजेच प्रत्येक संघ साखळी फेरी सुरु असताना एकमेकांशी सामना खेळेल. हे सामने झाल्यानंतर अव्वल ४ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

महत्त्वाच्या बातम्या – 

संपूर्ण वेळापत्रक: अशी होणार आहे भारत-दक्षिण आफ्रिका वनडे मालिका

ना रोहित, ना कोहली हा आहे ब्रायन लाराचा फेव्हरेट भारतीय खेळाडू

…तर आशिया इलेव्हन विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन संघांचे सामने होऊ शकतात रद्द

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---