आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२(icc under 19 world cup) स्पर्धेचा थरार शुक्रवार (१४ जानेवारी) पासून सुरू झाला आहे. यंदा ही स्पर्धा वेस्ट इंडिजमध्ये आयोजिक करण्यात आलेला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत २०००, २००८, २०१२ आणि २०१८ मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. यंदा यश धुलच्या (Yash dhull) नेतृत्वाखाली भारतीय संघ आपले ५ वे जेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. चला तर जाणून घेऊया कशी असेल या स्पर्धेची रूपरेखा.
भारतीय १९ वर्षाखालील संघाला या स्पर्धेतील आपला पहिला सामना १५ जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध (India under19 vs South Africa under 19) खेळायचा आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. तर भारतीय संघाची दुसरी लढत १९ जानेवारी रोजी आयर्लंड संघाविरुद्ध पार पडणार आहे. त्यानंतर युगांडा विरुद्ध २२ जानेवारीला भारताचा तिसरा साखळी सामना होईल.
स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने २२ जानेवारी पर्यंत रंगणार आहेत. त्यानंतर २५ जानेवारीपासून बादफेरीचे सामने सुरू होतील. ५ फेब्रुवारीला स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे.
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठी असे आहेत ४ गट
अ गट: बांगलादेश, इंग्लंड, कॅनडा, यूएई
ब गट: भारत, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, युगांडा
क गट: अफगाणिस्तान, पाकिस्तान, पीएनजी, झिम्बाब्वे
ड गट: ऑस्ट्रेलिया, स्कॉटलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज
असा आहे १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ स्पर्धेसाठी भारतीय संघ (Indian squad for icc under 19 world cup)
यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, एस. रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, दिनेश बाना, आराध्या यादव, राज अंगद बावा, मानव पारख, कौशल तांबे, आर.एस. हंगरगेकर, वासू वत्स, विकी ओस्तवाल, रविकुमार, गरव सांगवान.
राखीव: ऋषी रेड्डी, उदय सहारन, अंश गोसाई, अमृत राज उपाध्याय, अमृत राज उपाध्याय
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत अशी राहिली आहे भारतीय संघाची कामगिरी
सामने – ८३
विजय – ६३
पराभव – १९
अनिर्णीत – १
विजयाची टक्केवारी – ७६.८३%
आयसीसी १९ वर्षाखालील २०२२ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे साखळी फेरीतील सामने
१५ जानेवारी : विरुद्ध दक्षिण आफ्रिका, संध्याकाळी ७:३० वाजता
१९ जानेवारी: विरुद्ध आयर्लंड, संध्याकाळी ७:३० वाजता
२२ जानेवारी: विरुद्ध युगांडा, संध्याकाळी ७:३० वाजता
महत्वाच्या बातम्या :
वेस्ट इंडिजमध्ये रंगणार १९ वर्षाखालील विश्वचषकाचा थरार, ‘या’ ५ भारतीय खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष
‘हिटमॅनला बोलवा रे!’, राहुल – मयांकच्या जोडीच्या फ्लॉप शोनंतर नेटकऱ्यांच्या मागणीला जोर
हे नक्की पाहा: