---Advertisement---

कपिल देव यांची १९८३ विश्वचषकातील इंग्रजी ऐकून व्हाल लोटपोट, पाहा व्हिडिओ

On: सोमवार, डिसेंबर 13, 2021 5:53 PM
Ranveer-Singh
---Advertisement---

क्रिकेट आणि बॉलिवूडचं एक वेगळं नातं आहे. गेल्या काही वर्षात अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहेत. ज्याला चाहत्यांना देखील चांगला प्रतिसाद दिला आहे. लवकरच माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली भारतानो जिंकलेल्या १९८३ विश्वचषकावर आधारित ‘८३’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड स्टार रणवीर सिंग हा कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसून येणार आहेत.

हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, रणवीर सिंगने बलविंदर संधू यांचा एक मजेशीर व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. जो सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

रणवीर सिंगने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की, बलविंदर संधू रंग मंचावर एक मजेशीर किस्सा सांगताना दिसून येत आहेत. त्यावेळी रंग मंचावर कपिल देव देखील उपस्थित आहेत. ते १९८३ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील एक मजेशीर किस्सा सांगताना दिसून येत आहेत.

ते म्हणतात की, “कपिल नेहमी प्रमाणेच इंग्लंडमध्ये असल्यामुळे इंग्रजी बोलत होता. तो सर्वांना सूचना देत होता. त्यावेळी तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, ‘सरदार खूप टाइट गोलंदाजी करायची आहे. चौकार जाऊ द्यायचा नाहीये. आपण क्षेत्ररक्षक इथे, तिथे आणि तिथे ठेऊ.’ इतकं म्हणून तो निघून गेला.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “मी विचारलं कुठे? तर त्याला वाटलं मी मस्करी करतोय. तो मला म्हणाला, ‘ हा अंतिम सामना आहे, हा तरी जरा मनावर घ्या.’ कपिलने आपल्या माईंडमध्ये ठरवले होते की, क्षेत्ररक्षक कुठे ठेवायचा आहे. परंतु, मला काहीच माहीत नव्हते. त्याला वाटले की मस्करी करतोय.” हा किस्सा ऐकून कोणालाच हसू आवरले नाही.

https://www.instagram.com/tv/CXXwE9vI4sb/?utm_medium=copy_link

रणवीर सिंग या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारतोय. तर एमी विर्कने बलविंदर संधू यांनी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना १९८३ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार अनुभवायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या २४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

दुसऱ्या ऍशेस सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, संघातील दिग्गज गोलंदाज झाला बाहेर

खासदारांनी थोपटली युवा कौशलची पाठ; नुकतीच झालीये टीम इंडियात निवड

बापरे! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालाय तरी धोनी कमावतो कोट्यावधी रुपये; मालमत्ता जाणून बसेल धक्का

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---