---Advertisement---

असला कसला अंपायर? गोलंदाजाला आणले रडकुंडीला, पाहा मजेदार व्हिडिओ

On: रविवार, मे 23, 2021 6:48 PM
---Advertisement---

क्रिकेटच्या मैदानावर अनेक गंभीर तसेच मजेदार घटना घडत असतात. खेळाडू-खेळाडू किंवा कधीकधी प्रेक्षकदेखील या घटनांमध्ये सामील असलेले दिसून येतात. यांच्याबरोबरच मैदानावरील सर्व जबाबदारी सांभाळणारे पंचदेखील काही वेळा आपल्या कृत्यांनी प्रेक्षकांना व खेळाडूंना हसण्याची संधी देतात. असाच एक प्रसंग सध्या सुरू असलेल्या युरोपियन क्रिकेट सिरीजमध्ये आला. ज्यामध्ये पंचांनी एकप्रकारे गोलंदाजाची मस्करी केली. त्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध होत आहे.

अशी घडली घटना
सध्या युरोपात युरोपियन क्रिकेट सिरीज चांगलीच चर्चेत आहे. दररोज या स्पर्धेतील काही व्हिडिओ समोर येत आहेत. ज्यामध्ये कधी खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी किंवा कधी काही मजेदार प्रसंग घडलेले दिसून येतात. असाच एक मजेदार व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या स्पर्धेतील आचेन रायझिंग स्टार विरुद्ध वीएफबी गेल्सनकर्चेन यांच्यातील सामन्यात गेल्सनकर्चेनच्या फलंदाजाला बाद ठरवण्यासाठी पंचांनी इतका वेळ घेतला की अपील करणारा गोलंदाज त्या वेळात नाउमेद होऊन गेला होता. मात्र, पंचांनी त्यानंतर फलंदाजाला बाद ठरविले.

या सामन्यातील गेल्सनकर्चेन संघाच्या डावातील दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फलंदाजाच्या पायावर लागल्यानंतर गोलंदाजाने जोरदार अपील केली. बराच वेळ अपील करूनही पंचांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे गोलंदाज हताश होऊन उलटा फिरला आणि इकडे पंचांनी फलंदाजाला बाद घोषित केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळीकडे चांगलाच प्रसिद्ध झाला असून चाहत्यांची याला पसंती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

दुर्दैवी! देशाचे प्रतिनिधित्व केलेली खेळाडू करतेय वीटभट्टीवर काम, क्रीडामंत्र्यांनी घेतली दखल

“रोहित कधीही रागावलेला दिसला नाही”, मुंबईच्या ‘या’ गोलंदाजाची स्तुतीसुमने

बाद झाल्यावर विराटने दिलेली ‘ही’ प्रतिक्रिया, आवेश खानने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---