आधुनिक काळातील क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी सह क्षेत्ररक्षणही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे सर्वच खेळाडू क्षेत्ररक्षणाचा सराव करण्यासाठी देखील मैदानात घाम गाळत असतात. तुम्ही अनेक असे क्षेत्ररक्षक पहिले असतील,ज्यांनी आपल्या क्षेत्ररक्षणाच्या कौशल्याने अनेकांची मने जिंकली आहेत. अशाच एका क्षेत्ररक्षकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्याने आधी प्रेक्षकांची मने जिंकली आणि नंतर, तुम्हीच पाहा काय झाले ते.
सध्या युरोपियन क्रिकेट लीग स्पर्धेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या व्हिडिओ मध्ये क्षेत्ररक्षक, आपले जीव की प्राण लावत चेंडू थांबवतो आणि नंतर असे काही करतो की, मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना हसू आवरत नाही. तर झाले असे की, १० वे षटक सुरू असताना, गोलंदाज एस रामरावच्या चेंडूवर, फलंदाज पी जगताप याने जोरदार आक्रमण केले. तो चेंडू वेगाने सीमारेषेच्या दिशेने जात होता. इतक्यात सीमारेषेवर उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाने, डाईव मारून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. त्यावेळी सर्वांनीच त्याचे टाळ्या वाजवून कौतुक केले.
परंतु पुढे जे झाले, ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. क्षेत्ररक्षकाने तो चेंडू उचलून, यष्टीरक्षकाकडे अंडरआर्म थ्रो फेकला होता. जो चेंडू सरळ जाण्याऐवजी मागे, सीमारेषेच्या दिशेने गेला होता. इतका चांगला प्रयत्न पाण्यात गेला. यासोबतच फलंदाजाला ओव्हर थ्रोच्या ४ धावाही मिळाल्या. हे पाहून समालोचकालाही हसू आवरले नव्हते.
हा प्रकार पाहून समालोचक म्हणाले, “ही घटना नक्कीच हायलाईट्सचा भाग होईल.” या विनोदी घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती जाहीर करुनही पुनरागमन करणारे ८ खेळाडू, ३ आहेत पाकिस्तानी
आयपीएल आयोजनासाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला लागणार कात्री? पाहा काय आहे बीसीसीआयचा प्लॅन






