सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेमध्ये जगभरातील अनेक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. त्याचबरोबर यामध्ये भारतीय खेळाडूंनी देखील सहभाग घेतला आहे. इतकेच नव्हे तर आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनाने त्यांनी मैदान देखील गाजवले आहे. या खेळाडूंच्या यादीत स्मृती मांधनासोबत जेमीमा रोड्रिग्सचा देखील नावाचा समावेश आहे. जेमीमा रोड्रिग्स सध्या मैदानावर उत्कृष्ट प्रदर्शन करताना दिसून येते आहे. या स्पर्धेमध्ये तिने आतापर्यंत २ अर्धशतके झळकावली आहेत.
नुकताच जेमीमा रोड्रिग्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यामध्ये ती आपल्या विदेशी मैत्रिणींना हिंदी भाषा शिकवताना दिसून येत आहे. जेमीमाने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या नॉर्दर्न सुपरचार्जर्स संघातील साथीदारांसोबत वेळ घालवत आहेत. या व्हिडिओमध्ये त्या रेल्वे प्रवासाचा आनंद घेताना दिसून येत आहेत आणि जेमीमा आपल्या साथीदाराचे मनोरंजन करताना दिसून येत आहे.
या व्हिडिओमध्ये जेमीमा आपल्या दोन मैत्रीणींना “गाडी बाजूला थांबली आहे” हे हिंदीतील वाक्य शिकवत आहे. ती सुरुवातीला हे वाक्य एकदा उच्चारते. त्यानंतर त्या दोघी हे वाक्य बोलण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.
https://www.instagram.com/reel/CR02Trigpe9/?utm_source=ig_web_button_share_sheet
जेमीमा जेव्हाही भारतीय संघासोबत असते, तेव्हा संघातील खेळाडूंसोबत मस्ती-मजा करायची एकही संधी सोडत नाही. त्याचबरोबर त्यांचे मनोरंजन करण्याची कोणतीच कसर ती सोडत नसते. या वेळेस तिने द हंड्रेड स्पर्धेतील आपल्या संघाचे खूप मनोरंजन केले आहे. कधी जेमीमाने गिटार वाजवून तर कधी गाणं म्हणून सहकाऱ्यांचे मनोरंजन केले आहे. इतकेच नव्हे तर ती संघातील सर्वच खेळाडूंना उत्साही ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत असते.
महत्त्वाच्या बातम्या-
धवनने ‘रनमशीन’ कोहलीचा विक्रम केला ध्वस्त, धावा चोपण्याच्या विक्रमात बनला ‘अव्वल’
Video: विकेट मिळाल्याने चाहरचे डोळे दाखवत आक्रमक सेलिब्रेशन, लंकन फलंदाजानेही टाळ्या वाजवत…