पुणे,दि.5 डिसेंबर 2023: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात अर्णव पापरकर, कांडवेल महालिंगम अकिलांडेश्वरी, धीरज रेड्डी वेन्नापुसा, भुषन होबाम, वेंकट ऋषी बाटलंकी यांनी तर मुलींच्या गटात अमोदिनी नाईक, आकृती सोनकुसरे, आयशी बिश्त, हर्षिनी एन नागराज यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राच्या आकृती सोनकुसरेने रशियाच्या तिसऱ्या मानांकित जो-लीन सॉचा ६-४, १-६, ६-३ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. भारताच्या अमोदिनी नाईकने नवव्या मानांकित रशियाच्या लीला अख्मेटोवाचा ६-२, ६-१ असा तर, भारताच्या आयशी बिश्तने तेराव्या मानांकित इवा ख्रुस्तलेवाचा ६-१, ७-५ असा पराभव आगेकूच केली.
हर्षिनी एन नागराजने पंधराव्या मानांकित प्रिशा शिंदेचा ६-३, २-६, ६-३ असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला.
मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अर्णव पापरकर याने पाचव्या मानांकित काहिर वारिकचा टायब्रेकमध्ये ७-६(६), ४-६, ६-३ पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. कांडवेल महालिंगम अकिलांडेश्वरीने बाराव्या मानांकित सेहजसिंग पवारचा ६-१, ६-१ असा सहज पराभव केला. भारताच्या धीरज रेड्डी वेन्नापुसाने सर्बियाच्या नवव्या मानांकित अलेक्झांडर डस्कालोविकचा ६-३, ७-६(२) असा तर, भारताच्या भुषन होबामने सातव्या मानांकित देबासिस साहूचा ७-६(८), ६-४ असा पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला. अमेरिकेच्या वेंकट ऋषी बाटलंकी याने भारताच्या चौदाव्या मानांकित रायन साजिद कूथराटचे आव्हान ७-६(५), ७-५ असे संपुष्टात आले. कोरियाच्या आठव्या मानांकित जुआन किमने भारताच्या शंकर हेसनमचा ३-६, ७-६(६), ६-१ असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला.
निकाल: दुसरी फेरी: मुले: एकेरी:
हिरोमासा कोयामा (जपान)[१६] वि.वि.स्वर्मन्यू सिंग(भारत) ३-६, ७-५, ६-१;
इव्हान इउत्किन(रशिया)[१]वि.वि.तनिष्क जाधव (इंडिया) ६-१, ६-२;
कांडवेल महालिंगम अकिलांडेश्वरी (भारत)वि.वि. सेहजसिंग पवार(भारत) [१२] ६-१, ६-१;
हितेश चौहान (भारत)[६] वि.वि.ऋषिकेश सोनावणे(भारत)५-७, ६-२,६-१;
काझुमा किमुरा (जपान)[४]वि.वि.एगोर शेरबाकोव्ह ६-४, ६-४;
रेथिन प्रणव सेंथिल कुमार (भारत)[३]वि.वि.विशाल प्रकाश(भारत) ६-३, ४-६, ६-३;
अर्णव पापरकर (भारत)वि.वि.काहिर वारिक(भारत) [५] ७-६(६), ४-६, ६-३;
मोइस कौमे (फ्रांस)[१५]वि.वि.प्रकाश सरन(भारत)६-४, ६-२;
जुआन किम (कोरिया)[८]वि.वि.शंकर हेसनम (भारत) ३-६, ७-६(६), ६-१;
अर्जुन पंडित (भारत) [११] वि.वि.नील केळकर(भारत) ६-२, ६-२;
धीरज रेड्डी वेन्नापुसा (भारत)वि.वि.अलेक्झांडर डस्कालोविक (सर्बिया) [९] ६-३, ७-६(२);
विहान रेड्डी (भारत)वि.वि.वेद शेट्टी (भारत)६-४, ६-२;
जाडेन देवंडका टॅन (इंडोनेशिया) [१०]वि.वि.कशीत नागराळे(भारत)६-३, ६-७(३), ६-२;
वेंकट ऋषी बाटलंकी (अमेरिका)वि.वि.रायन साजिद कूथराट (भारत)[१४] ७-६(५), ७-५;
क्रिश त्यागी (भारत) [२] वि.वि.संप्रित शर्मा(भारत) ६-१, ६-१;
बुशन होबाम(भारत)वि.वि.देबासिस साहू(भारत)[७] ७-६(८), ६-४;
मुली:
अमोदिनी नाईक (भारत)वि.वि.लीला अख्मेटोवा [९] ६-२, ६-१;
माया रेवती (भारत) [१] वि.वि.लारा इसाबेला क्रॅलस (जर्मनी)७-६(५), ६-३;
यास्मिन वावरोवा (स्लोवाकिया) [७]वि.वि.आरुषी रावल (इंडिया) ६-३, ६-३;
आयशी बिश्त (भारत)वि.वि.इवा ख्रुस्तलेवा(रशिया)[१३] ६-१, ७-५;
आकृती सोनकुसरे (भारत)वि.वि.जो-लीन सॉ (मलेशिया) [३] ६-४, १-६, ६-३;
हर्षिनी एन नागराज (भारत)वि.वि.प्रिशा शिंदे (भारत) [१५] ६-३, २-६, ६-३;
ऋषिथा रेड्डी बसिरेड्डी (भारत) [८]वि.वि.सौम्या रोंडे (भारत) ६-३, ६-१;