वेस्टइंडीज क्रिकेटला अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा वारसा लाभलेला आहे. याच दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक क्रिकेटपटू म्हणजे सर गॅरी गोबर्स. त्यांचा आज वाढदिवस आहे. २८ जुलै १९३६ रोजी बार्बाडोसमध्ये जन्म घेतलेले गॅरी गोबर्स हे आज आपला ८६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या खेळाच्या तीनही विभागत आपली छाप सोडली आहे.
सोबर्स किती महान खेळाडू होते याचा अंदाज त्यांची आकडेवारी पाहून येते. त्यांची विशेषतः म्हणजे ते उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजीसह मिडीयम पेस आणि रिस्ट स्पिन गोलंदाजी देखील करायचे. चला तर पाहूया त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील काही महत्वाच्या गोष्टी.
गॅरी गोबर्स यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला होता. कुटुंबाची परिस्थिती इतकी हलाकीची होती की, त्यांचे वडील आपल्या मुलासाठी पॅन्ट देखील खरेदी करू शकत नव्हते. याच कारणास्तव त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत शॉर्ट्सवर क्रिकेट खेळले होते. तसेच १९५२-५३ साली त्यांना वेस्टइंडीजच्या संघात स्थान मिळाले होते. (Garry sobers birthday special : greatest all rounder turns 85 find out his career achievements)
गोलंदाज म्हणून पदार्पण आणि पहिल्याच कसोटी शतकात ठोकल्या ३६५ धावा
गॅरी सोबर्स यांनी वेस्टइंडीज संघाकडून पदार्पण केले होते. इंग्लंड संघाविरुद्ध खेळलेल्या पहिल्याच सामन्यात त्यांनी ४ गडी बाद केले होते. यासह त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत असा कारनामा केला होता, ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही. पदार्पणाच्या ४ वर्षानंतर त्यांनी पाकिस्तान संघाविरुद्ध आपले पहिले कसोटी शतक झळकावले होते. त्यांनी नाबाद ३६५ धावांची तुफानी खेळी केली होती. हा विक्रम ३६ वर्ष कोणी तोडू शकला नव्हता. त्यानंतर १९९४ मध्ये ब्रायन लाराने ३७५ धावांची खेळी करत हा विक्रम मोडला होता.
सोबर्सच्या डोक्याला लागला होता चेंडू
इंग्लंड संघाविरुद्ध त्यांनी आपल्या कसोटी पदार्पण केले होते. याच सामन्यात लेन हट्टन यांचा एक चेंडू त्यांच्या डोक्याला जाऊन धडकला होता. सोबर्स यांनी त्याचा चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तो चेंडू त्यांच्या डोक्याला जाऊन धडकला होता. त्यानंतर सोबर्स यांनी कधीही बाउन्सर चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला नाही.
क्रिकेटच्या इतिहासात सर्वात आधी ६ चेंडूवर ६ षटकार मारण्याचा कारनामा सोबर्स यांनीच केला होता. त्यांनी हा कारनामा मॅकलम नॅशच्या गोलंदाजीवर केला होता. त्यानंतर रवी शास्त्री, युवराज सिंग, हर्शल गिब्स आणि कायरन पोलार्डने देखील हा कारनामा केला होता.
जेव्हा मद्यपान करून सोबर्स यांनी झळकावले होते शतक
गॅरी सोबर्स यांनी १९७३ मध्ये लॉर्डसच्या मैदानावर चक्क मद्यपान करून शतक झळकावले होते. तर झाले असे की, लॉर्डस कसोटी सुरु असताना गॅरी सोबर्स हे नाबाद ३१ धावांवर फलंदाजी करत होते. त्यानंतर क्लाइव लॉयडने त्यांना नाईट क्लबमध्ये येण्यास सांगितले होते. या खेळाडूंनी तिकडे जाऊन सकाळी ४ वाजेपर्यंत मद्यपान केले. परंतु, दुसऱ्या दिवशी फलंदाजी करायची होती, म्हणून सोबर्स यांनी न झोपण्याचा निर्णय घेतला होता.
त्यांचे म्हणणे असे होते की, ते जर झोपले तर ते दुसऱ्या दिवशी खेळण्यासाठी उठू शकणार नाही, म्हणून त्यांनी क्लेयरेंडन कोर्ट येथे आणखी मद्यपान केले. त्यानंतर ते लॉर्ड्समध्ये अंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते फलंदाजी करण्यासाठी देखील उतरले होते. त्यांना सुरुवातीचे पाच चेंडू दिसले देखील नव्हते. परंतु, ६ वा चेंडू त्यांच्या बॅटच्या मध्यभागी लागला आणि नंतर त्यांनी शतक देखील झळकावले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष- गॅरी सोबर्सबद्दल कधीही न ऐकलेल्या १० गोष्टी
जडेजाने डोक्याला शॉट लावलाय! दुखापतीच्या कारणाने आता होऊ शकतो टी२० मालिकेतूनही बाहेर
जबरस्त सिक्स अन् मोईनचा पराक्रम! ठोकली टी२०मध्ये दुसरी सर्वात जलद फिफ्टी, युवी अजूनही ‘नंबर १’