---Advertisement---

नेहमी धोनीला कोसणाऱ्या गंभीरचे बदलले सूर, आयपीएल फायनलपूर्वी उधळली स्तुतीसुमने; पाहा काय म्हणाला?

On: शुक्रवार, ऑक्टोबर 15, 2021 4:04 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी याला क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक समजले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यानंतरही तो आयपीएलमध्ये आपल्या तितक्याच चातुर्याने नेतृत्त्व करताना दिसतो आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई संघाने आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) दुबई येथे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्यांचा महामुकाबला होणार आहे.

तत्पूर्वी नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन धोनीवर निशाणा साधणाऱ्या कोलकाताच्या माजी कर्णधार गौतम गंभीरने त्याचे गुणगान गायले आहे. धोनी जरी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसला तरीही तो कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गनपेक्षा चांगला संघनायक असल्याचे गंभीरने म्हटले आहे.

गंभीरने ईएसपीएनक्रिकइंफोशी बोलताना धोनी आणि मॉर्गन यांच्याविषयी बोलताना सांगितले की, “त्यांच्या फॉर्मची तुलना करणे चुकीचे आहे. कारण धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि दुसरा खेळाडू अर्थातच मॉर्गन अजूनही राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. कधीही सफरचंदची तुलना संत्र्याशी करू नये. धोनीने बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही, त्यामुळे तो चांगल्या फॉर्ममध्ये नाही किंवा कमी योगदान देत असल्यास हे स्विकाहार्य आहे. पण मॉर्गन अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय. तरीही जर या दोघांची तुलना करायचीच असेल, तर धोनी मॉर्गनपेक्षा खूप उत्कृष्ट आहे.”

“धोनी ३ गोष्टी करतो. त्या म्हणजे, नेतृत्त्व, फलंदाजी आणि यष्टीरक्षण. मॉर्गन फक्त नेतृत्त्व आणि फलंदाजीच करतो. त्यातील एकात तर त्याचे प्रदर्शन अतिशय खराब राहिले आहे. पण धोनीने कर्णधार आणि यष्टीरक्षकाच्या रुपात आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे त्यांच्या फॉर्मची तुलना योग्य नसेल,” असेही तो म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---