रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध झालेला आयपीएल २०२२चा एलिमिनेटर सामना लखनऊ सुपरजायंट्सने १४ धावांनी गमावला. लखनऊ संघाच्या या पराभवासाठी त्यांचे गचाळ क्षेत्ररक्षण जबाबदार ठरले. लखनऊ संघाने बेंगलोरच्या फलंदाजांचे ४ झेल सोडले. ज्याचे फळ त्यांना भोगावे लागले. या सामन्यासह लखनऊचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले. अशातच लखनऊ संघाचे मार्गदर्शक गौतम गंभीर यांचा संघनायक केएल राहुलसोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोत गंभीर (Gautam Gambhir) सामन्यानंतर रागाने राहुलकडे (KL Rahul) बघताना दिसत आहेत. तर राहुल डोके घालून उभा राहिला आहे. या फोटोवरून अनेक चाहत्यांनी अंदाज बांधला आहे की, गंभीर राहुलवर (Gautam Gambhir Angry On KL Rahul) चिडले आहेत. गंभीरचे हे वागणे चाहत्यांना अजिबात आवडले नसून अनेकांनी गंभीरला यावरून ट्रोल केले आहे.
https://twitter.com/TukTuk_Academy/status/1529539259966685184?s=20&t=m8PCNXZFzpjJk6nCeEHBhg
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1529538691181563904?s=20&t=m8PCNXZFzpjJk6nCeEHBhg
काही चाहत्यांनी गंभीरचा राहुलला रागवतानाचा फोटो शेअर करत लिहेल आहे की, गंभीरला राहुलला रागावण्याचा कसलाही हक्क नाही. तर काहींनी गंभीरला त्याच्या कामाशी मतलब ठेवायला सांगितले आहे.
https://twitter.com/TukTuk_Academy/status/1529539259966685184?s=20&t=-8eHiaYZjf72GjbRgXCD8w
https://twitter.com/smileandraja/status/1529538178729771012?s=20&t=89v2xSpz3upCDxfzPNkvzg
केएल राहुलने झेल सोडल्यानंतर गंभीरची प्रतिक्रिया व्हायरल
याशिवाय राहुलच्या हातून सामन्यादरम्यान बेंगलोरचा फलंदाज दिनेश कार्तिकचा झेल सुटला. यावरही गंभीरने दिलेली प्रतिक्रिया कॅमेरात कैद झाली आहे.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1529492484031586304?s=20&t=NidtaBOKt3aWVF3w6FP2Zg
बेंगलोरच्या डावातील पंधराव्या षटकादरम्यान हा प्रसंग घडला. मोहसिन खानच्या या षटकातील पाचव्या चेंडूवर कार्तिकने (Dinesh karthik) ऑन साईडला जोराचा फटका मारला. ऑन साईडला क्षेत्ररक्षण करत असलेल्या राहुलने वेगाने पळत जात चेंडू टिपण्यासाठी डाईव्ह मारली. त्यामुळे त्याला पाहून डगआऊटमधून सामना पाहात असलेल्या मार्गदर्शक गंभीरने टाळ्या वाजवत जल्लोष साजरा करायला सुरुवात केला. परंतु तो चेंडू त्याच्या हातून निसटला (KL Rahul Dropped Catch)आणि कार्तिकला जीवनदान मिळाले. हे पाहून जल्लोष साजरा करत असलेल्या गंभीरची (Gautam Gambhir Reaction)निराशा झाली आणि त्याने डोके धरले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘भविष्यात हे नाव…’, एलिमिनेटर सामन्यात शतक ठोकणाऱ्या रजत पाटीदारबद्दल विराटचं मन जिंकणारं विधान
आयपीएलच्या झगमगाटात नवी कसोटी क्रमवारी जाहीर; रोहित-विराट-बुमराहला…
क्या मस्त खेला रे तू! विराटच्या नेत्रदिपक चौकाराचं गांगुली, जय शहाकडून कौतुक, रिऍक्शन कॅमेरात कैद






