आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या दिग्गज खेळाडूंना पुन्हा मैदानावर घेऊन येण्यासाठी एका लीगचे आयोजन केले जाते. ती लीग म्हणजेच लीजेंड्स लीग क्रिकेट होय. या लीगचे पहिले दोन हंगाम पार पडले आहेत, ज्यांना क्रिकेटप्रेमींनी भरभरून प्रेम दिले होते. अशात आता या लीगच्या तिसऱ्या हंगामाचीही तयारी जोरात सुरू झाली आहे. या स्पर्धेची सुरुवात एलएलसी मास्टर्सच्या रूपात 10 मार्चपासून होणार आहे. तत्पूर्वी, स्पर्धेच्या आयोजकांनी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या तिन्ही संघांच्या कर्णधारांची घोषणा केली.
यावेळी स्पर्धेत माजी दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेले 3 संघ भाग घेतील. यामध्ये इंडिया महाराजा, आशिया लायन्स आणि वर्ल्ड जायंट्स संघांच्या नावाचा समावेश आहे. यावेळी इंडिया महाराजा संघाचे नेतृत्व भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा करेल. तर, आशिया लायन्सचे नेतृत्व पाकिस्तानचा माजी कर्णधार व अष्टपैलू शाहिद आफ्रिदी याच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर वर्ल्ड जायंट्सचे नेतृत्व नुकताच निवृत्त झालेला ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक विजेता कर्णधार ऍरॉन फिंच करताना दिसणार आहे.
मागील आठवड्यातच स्पर्धेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले होते. सहभागी हे 3 संघ साखळी सामन्यात एकमेकांशी प्रत्येकी 2 सामने खेळताना दिसतील. त्यानंतर प्लेऑफमध्ये दोन सामने खेळले जातील. साखळी सामन्यात पहिले स्थान पटकावणाऱ्या संघाला थेट अंतिम सामन्याचे तिकीट मिळेल. तसेच, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघांमध्ये एलिमिनेटर सामना होईल. त्यात जो संघ जिंकेल, तो अंतिम सामन्यात जागा मिळवेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सर्व सामने सायंकाळी 8 वाजता सुरू होतील. सर्व सामने दोहा येथील एशियन टाऊन क्रिकेट स्टेडिअममध्ये खेळले जातील.
(Gautam Gambhir Lead India Maharaja In Legends League Cricket 2023 Afridi And Finch Lead Other Teams)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी कर्णधार असतो, तर त्याच्यासाठी…’, फ्लॉप ठरत असलेल्या राहुलला मिळाला आणखी एका दिग्गजाचा पाठिंबा
वडिलांना गमावल्यानंतर खचला नाही उमेश, पुनरागमन करताच गाठली बळींची ‘शंभरी’, आता लक्ष्य नव्या रेकॉर्डवर