आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि विद्यमान भारतीय कर्णधार विराट कोहली यापैकी संघात कुणाला निवडणार असा प्रश्न भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर याला विचारण्यात आला होता. त्यावेळी गौतम गंभीरने एक आश्चर्यजनक उत्तर दिले. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यापैकी सचिन तेंडुलकरला संघात स्थान देईल असे गौतम गंभीरने सांगितले.
स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड या कार्यक्रमात गंभीरला हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने सचिन तेंडूलकरच्या नावाला पसंती दिली. गौतम गंभीर म्हणाला, सचिनने २०१३ साली क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्त झाला. त्याच्या नावे सर्वाधिक विक्रमांची नोंद आहे. तो असा खेळाडू आहे ज्याच्या नावावर शंभर आंतरराष्ट्रीय शतकांची नोंद आहे.
विराटच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याने कसोटीमध्ये २७ आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ४३ शतके ठोकली आहेत. विराटने आतापर्यंत ७० शतके केली आहेत. तो सचिन तेंडुलकरचा शंभर शतकांचा विक्रम मोडू शकतो.
सचिन आणि विराट पैकी गंभीरने सचिनला का निवडले याचा खुलासा देखील या वेळी केला. गंभीर म्हणाला, सचिन तेंडुलकर सफेद चेंडूसोबत (वनडेत) चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले आहे. नव्या फलंदाजांसाठी क्रिकेटचे नियम अधिक सोपे झाले आहेत. सचिन तेंडुलकरच्या काळात असे नियम नव्हते. दोन्ही बाजूने दोन नवे चेंडूचा वापर, रिव्हर स्वींग न होणे, पन्नास षटकांच्या सामन्यात पाच खेळाडू सर्कलच्या आत राहणे. हे नवे नियम आजच्या नव्या फलंदाजांसाठी खूप सोईस्कर आहेत. सचिनचा काळ पाहिला तर त्यावेळेचे नियम वेगळे होते. त्यावेळी २३०-२४०धावा या आव्हान देऊ शकत होत्या. त्यामुळे मी सचिन तेंडुलकरला निवडेन.
विशेष म्हणजे गौतम गंभीर आणि विराट कोहली हे पूर्वी दिल्ली या रणजी संघाकडून क्रिकेट खेळत होते. विराट आणि गौतम गंभीर यांच्यात आयपीएलच्या सामन्यांच्या वेळी प्रचंड वादावादी झाली होती. गौतम गंभीरने विराट कोहलीवर अनेकदा टीका देखील केली आहे.