आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने यूएईत सुरु झाले आहेत. रविवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना पार पडला. आयपीएलच्या उर्वरित सामन्यांविषयी अनेक दिग्गजांनी त्यांची मते व्यक्त केली आहेत. स्पर्धेत प्लेऑफमध्ये कोणते चार संघ पोहोचणार याबाबातही सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. भारताचा माजी दिग्गज खेळाडू गौतम गंभीरने चार संघांची नावे घेतली आहे, जे त्याच्या मते आयपीएलच्या चालू हंगामात प्लेऑफमध्ये पोहचू शकतात.
गंभीरने दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज, राॅयल चॅलेंजर बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स या संघांना निवडेले आहे. गंभीरने एकही आश्चर्यचकित करणारे नाव घेतले नाही, कारण हे चारही संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या चारमध्ये कायम आहेत.
दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात आठ सामने खेळले असून त्यातील सहा सामने जिंकले आहेत. चेन्नईने पिहिल्या टप्प्यात सात आणि दुसऱ्या टप्प्यातील झालेला एक सामना धरून आठ सामने खेळले आहेत आणि त्यापैकी सहा सामने जिंकले आहेत. तसेच राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने सातपैकी पाच सामने जिंकले आहेत आणि मुंबईने चार सामन्यात विजय मिळवला आहे.
गंभीर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला, “माझ्यासाठी वरचे चार संघ, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज, राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स असतील. सामन्यांसोबत स्थिती बदलू शकते, पण हे चार प्रबळ दावेदार आहेत.”
पंजाब किंग्जही प्लेऑफमध्ये त्यांची जागा बनवू शकते, असेही गंभीरने सांगितले आहे. तो म्हणाला, “पंजाब किंग्जकडे एक बाहेरची संधी आहे. तो एकमात्र संघ आहे, ज्यांच्याकडे प्लेऑफमध्ये जागा बनवण्यासाठी वास्तविक संधी आहे.” पंजाबने आठ सामने खेळले आहेत, ज्यामधील केवळ तीन सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे. पंजाब संघाने जर, येणाऱ्या सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन केले, तर ते प्लेऑफमध्ये जागा मिळवू शकतात.
यावेळी कार्यक्रमात गंभीरसोबत वेस्टइंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लारा उपस्थित होता. त्याने केकेआरविषयी बोलताना सांगितले की, त्यांच्याकडे एक प्रतिभाशाली संघ आहे. तसेच तो गंभीरच्या म्हणण्याशीही सहमत होता की, पंजाबकडे एक संधी आहे. तो म्हणाला, ‘कोलकाता नाइट रायडर्सकडे एक प्रतिभाशाली संघ आहे, पण पंजाब किंग्जला प्लेऑफमध्ये संधी मिळवण्यासाठी समर्थन देईल. पंजाब किंग्जकडे बाजी पलटण्याची पूर्ण ताकत आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
सामनावीर ऋतुराज म्हणतोय, ‘जेव्हा धोनी तुमच्या बरोबर असतो, तेव्हा…’
वानिंदू हसरंगाचे होऊ शकते आयपीएल पदार्पण, आरसीबीची ‘अशी’ असेल संभावित ‘प्लेइंग इलेव्हन’
सूर्यकुमारच्या ‘त्या’ कृत्याचे केले जातेय चाहत्यांकडून कौतुक