भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये आजपासून (१८ जून) साउथम्प्टनच्या मैदानावर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. कसोटी क्रिकेटकडे चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी आयसीसीने २ वर्षांपुर्वी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात केली होती. आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली आहे. तत्पुर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर याने कसोटी क्रिकेटची रुची वाढवण्यासाठी आणखी काय बदल करता येऊ शकतात याबाबत भाष्य केले आहे.
भारतीय संघासाठी ५८ कसोटी सामने खेळलेल्या माजी भारतीय क्रिकेटपटू गंभीरने म्हटले की, “जर क्रिकेटरसिकांचा कसोटी क्रिकेटमधील रस वाढवायचा असेल तर नाणेफेक रद्द करण्यात यावी. यामुळे यजमान संघाला फायदा होणार नाही. कारण प्रत्येक संघ आपल्या देशात विजय मिळवण्यात सक्षम असतो.”
“गेल्या ५ वर्षात भारतीय संघाने मायदेशात विजय मिळवला आहे. परंतु इंग्लंडमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हीच परिस्थिती इंग्लंड संघाची देखील आहे. त्यांना मायदेशात विजय मिळवण्यात यश येते. तर भारतात पराभवाचा सामना करावा लागतो. यावरून स्पष्ट होते की, कुठलाही संघ विश्वविजेता संघ नाही,” असे त्याने पुढे म्हटले. (Gautam Gambhir says that toss should end in test Cricket ahead of WTC final)
तसेच तो पुढे म्हणाला की, “नाणेफेक बंद केली तर आपण आणखी चांगली खेळपट्टी बनवू शकतो. पाहुण्या संघाला असे विचारता येऊ शकते की, तुम्ही फलंदाजी करणार की गोलंदाजी. त्यामुळे आणखी चांगले क्रिकेट पाहायला मिळू शकते. याचा परिणाम असा ही होऊ शकतो की, इंग्लंडचा खेळपट्टीवर गवताचे प्रमाण कमी होऊन जाईल आणि भारतात फिरकी गोलंदाजांसाठी उपयुक्त खेळपट्टी बनवणे बंद होईल.”
तसेच विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याबाबत बोलताना तो म्हणाला, “दोन्ही संघांमध्ये तुलना करणे योग्य नसेल. कारण हे प्रत्येक वर्षी होणार आहे आणि विश्वचषक स्पर्धा ४ वर्षांतून एकदा येते. जो चांगला खेळणार तो या सामन्यात विजय मिळवू शकतो. भारतीय संघाने या सामन्यात जास्त दबाव घेऊ नये.”
महत्त्वाच्या बातम्या-
माजी कर्णधाराकडून भारतीय संघाला विजयाचा मंत्र, फक्त कॅप्टन कोहलीला करावं लागणार ‘हे’ काम
कसोटी अजिंक्यपद: टॉस ठरणार बॉस! न्यूझीलंडविरुद्ध ‘असा’ आहे कर्णधार कोहलीच्या नाणेफेकीचा विक्रम
भारत-न्यूझीलंड WTC फायनल १४४ वर्षांच्या इतिहासातील ‘सर्वात मोठा सामना’, वाचा यामागची कारणे






