---Advertisement---

माजी कर्णधाराकडून भारतीय संघाला विजयाचा मंत्र, फक्त कॅप्टन कोहलीला करावं लागणार ‘हे’ काम

On: शुक्रवार, जून 18, 2021 10:35 AM
rohit sharma virat kohli ajinkya rahane
---Advertisement---

पहिलावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सुरू व्हायला आता काही तासांचाच अवधी शिल्लक आहे. या ऐतिहासिक सामन्यासाठी भारत आणि न्यूझीलंड हे दोन्हीही संघ जय्यत तयारीनिशी मैदानात उतरणार असून क्रिकेटरसिक देखील या सामन्याची आतुरतेने वाट पाहात आहे. या सामन्यापूर्वी माजी भारतीय कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याने भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिला आहे.

गांगुलीने सांगितले की, नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने सर्वप्रथम फलंदाजीचा निर्णय घ्यायला हवा. कारण परदेशी दौऱ्यांवर प्रथम फलंदाजीचा निर्णय संघाच्या हिताचा राहिलेला आहे. गांगुलीला विश्वास आहे की विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ हा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावेल. परंतु केन विलीयम्सनच्या न्यूझीलंड संघाची गुणवत्ता बघता हा सामना अटीतटीचा होणार हे निश्चित.

‘आज तक’सोबत बोलतांना गांगुलीने सांगितले, ‘तुम्ही नोंदी बघितल्यास तुमच्या लक्षात येईल की भारताने विदेशात सर्वश्रेष्ठ कामगिरी (2020-21 चा ऑस्ट्रेलिया दौरा वगळता) तेव्हाच केली आहे, जेव्हा-जेव्हा संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हे तुमच्यावर आहे की, तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत सुरवातीलाच दबावाचा सामना करता की चौथ्या डावाची वाट बघता.’

गांगुलीने पुढे सांगितले की, ‘2002 चा लीड्सचा सामना घ्या किंवा 2018 चा दक्षिण आफ्रिका दौरा, आपण गोलंदाजीसाठी अनुकूल परिस्थितीतही प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी संघाने सुरुवातीला दबावाचा सामना केला, तरीही मोठ्या धावा केल्या आणि अशा प्रकारेच सामने जिंकले जातात. मार्क टेलर किंवा स्टीव्ह स्मिथच्या ऑस्ट्रेलियन संघाने देखील वेगवान गोलंदाजीला अनुकूल परिस्थितीत क्वचितच प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. क्वचित कधीतरी जेव्हा खेळपट्टी ओली असेल तेव्हाच त्यांनी असा निर्णय घेतला आहे.’

न्यूझीलंड आणि नंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत वेगवान गोलंदाजी आक्रमणाला अयशस्वी करण्याची महत्वाची जबाबदारी रोहित शर्मा आणि शुभमन गिलला पार पाडावी लागणार आहे. याबाबत माजी कर्णधाराने सांगितले की, ‘रोहित आणि शुभमनला संघाला चांगली आश्वासक सुरुवात करून द्यावी लागेल. त्यांना कमीतकमी 20 षटके फलंदाजी करावी लागेल. जेणेकरून चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि रिषभ पंत यांना फलंदाजी करताना एक तयार मंच मिळेल.”

गांगुलीने विलीयम्सन आणि टीम साउथीच्या अनुपस्थितीत देखील इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकणाऱ्या न्यूझीलंड संघाचे कौतुक केले. त्याने सांगितले की, ‘न्यूझीलंडचा हा संघ गेल्या 30-35 वर्षांतील त्यांचा सर्वोत्तम संघ आहे. त्यांनी इंग्लंडला इंग्लंडमधेच धूळ चारली. त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्यामुळे भारतासाठी हा अंतिम सामना सोपा नसेल. कारण न्यूझीलंड उत्तम क्रिकेट खेळत आहे.’

पुढे गांगुलीने सांगितले की, ‘हा फक्त विजय नसून एक संघ म्हणून ते खूप ताकदवर आहेत. त्यांनी विलीयम्सन, साउथी आणि जेमिसनच्या अनुपस्थितीत देखील विजय मिळवला. मला नवा खेळाडू विल यंग देखील उत्तम खेळाडू वाटला. त्याने अतिशय धैर्याने बर्मिंघममध्ये स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसनचा सामना केला. भारताला पुन्हा लय प्राप्त करण्यासाठी वेळ लागेल. कारण भारतीय संघाने मागील काही काळात जास्त कसोटी सामने खेळलेले नाहीत. परंतु एकूणच हा अंतिम सामना रोमांचक होईल.’

महत्त्वाच्या बातम्या-

कसोटी अजिंक्यपद: टॉस ठरणार बॉस! न्यूझीलंडविरुद्ध ‘असा’ आहे कर्णधार कोहलीच्या नाणेफेकीचा विक्रम

भारत-न्यूझीलंड WTC फायनल १४४ वर्षांच्या इतिहासातील ‘सर्वात मोठा सामना’, वाचा यामागची कारणे

कर्णधार कोहलीची ‘खरी कसोटी’, १४ वर्षांत पहिल्यांदाच भारत धोनीशिवाय खेळणार आयसीसी स्पर्धेची फायनल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---