---Advertisement---

कर्णधार कोहलीची ‘खरी कसोटी’, १४ वर्षांत पहिल्यांदाच भारत धोनीशिवाय खेळणार आयसीसी स्पर्धेची फायनल

On: शुक्रवार, जून 18, 2021 9:18 AM
MS Dhoni
---Advertisement---

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आजपासून (१८ जून) सुरु होणार आहे. या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाने अतिशय मेहनत घेतली आहे. गेली २ वर्षे भारतीय संघाने जगातल्या वेगवेगळ्या संघांसोबत कसोटी सामने खेळत अंतिम सामन्यात मजल मारली आहे. परंतु आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतीय संघ मागील १२ वर्षांत पहिल्यांदा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(आयसीसी)च्या कोणत्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात खेळणार आहे.

भारतीय संघ २००७ पासून धोनीच्या नेतृत्त्वाखाली आयसीसीच्या स्पर्धा खेळत आला आहे. मागील १४ वर्षात पहिल्यांदाच असे होईल की, भारतीय संघ त्याचाशिवाय आयसीसीच्या अंतिम फेरीत खेळेल. त्यामुळे भारतीय संघाला अंतिम सामन्यात धोनीच्या अनुभवाची गरज भासेल यात काही शंकाच नाही.

कर्णधार विराट कोहलीसाठी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना महत्वाचा असून त्याचा कर्णधारपदाचा खरा कस या सामन्यात लागणार आहे. कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने दोन आयसीसीच्या स्पर्धा खेळला आहेत. त्यात २०१७ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि विश्वचषक २०१९ यांचा समावेश होतो. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ अंतिम सामन्यात गेला होता. परंतु, अंतिम सामन्यात त्याचा पाकिस्तानकडून पराभव झाला. तसेच २०१९च्या उपांत्यफेरीत कोहलीचा संघ न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाला आणि विश्वचषकातून बाहेर पडला होता.

धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिलावहिला टी-२० विश्वचषक समान खेळला होता. सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुलीसारख्या अनुभवी खेळाडूंची अनुपस्थितीत सुद्धा धोनीच्या संघाने अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता आणि पाकिस्तानला हरवून पहिला टी-२० विश्वचषक भारतीय जिंकला होता.

२०११च्या विश्वचषक अंतिम सामन्यात सुद्धा भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान सारख्या संघाना हरवून भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली  होती. अंतिम फेरीत श्रीलंकासारख्या बलाढ्य संघाला हरवून भारतीय संघाने २८ वर्षानंतर विश्वचषकावर आपले नाव कोरले. परंतु धोनीची ही भूक काही संपता संपत नव्हती. २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा धोनीने आयसीसी स्पर्धेच्या चषकावर नाव कोरले होत. अंतिम सामन्यात इंग्लंड संघाला हरवून धोनीने त्याचा कारकिर्दीतली शेवटची आयसीसीची ट्रॉफी जिंकली होती.

याखेरीज धोनीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने २०१४ आणि २०१६ च्या टी-२० विश्वचषकात अनुक्रमाने अंतिम सामना आणि उपांत्य फेरी सामना गाठला होता. परंतु त्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

‘भारत सर्वश्रेष्ठ संघ, आम्हाला विजयाचा दावेदार म्हणू नका,’ केन विलियम्सनची प्रामाणिक कबुली

अंतिम लढतीपुर्वी कोहलीचे भाष्य, म्हणाला, ‘५ दिवसांवरुन काहीही सिद्ध होणार नाही, मागील ५ वर्षे…’

कसोटी चॅम्पियनशीप फायनलपुर्वी भारतीय क्रिकेटमध्ये शोककळा, १९४ विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाचे निधन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---