गौतम गंभीरची (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. तो आता आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्ससोबत (KKR) असणार नाही. जर तुम्ही भारताच्या विजयाचं स्वप्न पाहत असाल, तर मला या क्षणी केकेआर सोडावं लागेल. संघाचा निरोप घेण्यापूर्वी गौतम गंभीरनं त्याच्या चाहत्यांना असा भावनिक संदेश दिला. आयपीएल 2024 मध्ये कोलकाताला चॅम्पियन बनवणाऱ्या गंभीरनं खूप भावूक व्हिडिओ शेअर केला आहे.
केकेआरची साथ सोडताना गंभीर म्हणाला, “जेव्हा तुम्ही हसता तेव्हा मीही हसतो. तुम्ही रडता तेव्हा मी पण रडतो. जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तो माझाही विजय असतो. तुम्ही हरल्यावर मी पण हरतो. जेव्हा तुम्ही स्वप्न पाहता तेव्हा मीही तुमच्याबरोबर स्वप्न पाहतो. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट साध्य करता तेव्हा ती माझ्याकडूनही साध्य होते. माझा विश्वास तुमच्यासोबत आहे. मी तुमचाच आहे कोलकाता आणि तुमच्यापैकीच एक आहे.”
Come Kolkata, let’s create some new legacies @KKRiders @iamsrk @indiancricketteam
Dedicated to Kolkata and KKR fans…
Special thanks to Cricket Association of Bengal @cabcricket @kkriders
Directed by:
@pankyyyyyyyyyyyyDOP: @Rhitambhattacharya
Written by:
Dinesh Chopra… pic.twitter.com/vMcUjalOLj— Gautam Gambhir (@GautamGambhir) July 16, 2024
पुढे बोलताना गंभीर म्हणाला, “मला तुमचा संघर्ष माहित आहे आणि दु:खही माहित आहे. नाकारल्यावर मलाही वेदना होतात पण अपेक्षांना मिठी मारुन मी उभा राहतो. मला रोज पराभवाचा सामना करावा लागतो परंतू तुमच्यासारखा कधी हरलो नाही. ते मला लोकप्रिय होण्यास सांगतात, मी त्यांना विजेता होण्यास सांगतो. मी तुमचाच आहे कोलकाता आणि तुमच्यापैकीच एक आहे.”
“कोलकाताची हवा माझ्याशी बोलत आहे. त्यांचे आवाज, रस्ते, ट्रॅफिक हे सर्व मला सांगते की तुम्हाला कसे वाटते? तुम्ही काय म्हणता ते मी ऐकू शकतो पण तुम्हाला काय हवं आहे हे मला माहीत आहे. मला माहित आहे की तुम्ही भावनिक आहात, मीही तुमच्या सारखाच भावनिक आहे. कोलकाता माझे कुटुंब आहे, माझी एक कथा आहे. आम्ही एक संघ आहोत.”
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधारपद तर फक्त ट्रेलर, पाहा पुढे आणखी काय काय होणार.., गौतम गंभीरने 2023 मध्येच दिलेला इशारा
रोहितला ऐकावा लागला प्रशिक्षक गंभीरचा आदेश! वनडे मालिकेतून पुनरागमन करण्याची शक्यता
श्रीलंका दौऱ्याआधीच भारत-पाकिस्तान आमने-सामने…! पाहा कधी होणार सामना?