भारतीय संघ सध्या आयसीसी टी20 विश्वचषकाच्या (ICC T20 World Cup) दौऱ्यावर आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा यंदाच्या टी20 विश्वचषकानंतर कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआय भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षकाच्या शोधात होती. परंतु आता भारतीय संघाचा माजी सलामीवीर गोतम गंभीर भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी निश्चित झाला आहे. गौतम गंभीरची (18 जून) रोजी प्रशिक्षक पदासाठी पहिली मुलाखत झाली. बीसीसीआयच्या सल्लागार समितीनं त्याची व्हिडिओ काॅलद्वारे मुलाखत घेतली.
बीसीसीआयच्या एका सूत्रानं माहिती दिली आहे की, गोतम गंभीर सध्या प्रशिक्षक होण्यासाठी आघाडीवर आहे. तो आजच्या पहिल्या मुलाखतीसाठी उपस्थित होता. आज एका चर्चेची फेरी संपली. शक्यतो उद्या (19 जून) रोजी संध्याकाळी दुसरी मुलाखत घेतली जाईल.” परंतु चर्चा सुरु झाल्या आहेत की, 48 तासात गंभारची प्रशिक्षकपदी निवड होण्याची शक्यता आहे. गंभीरची मुलाखत घेतेवेळी भारताचे अशोक मल्होत्रा, जतिन परापांजे आणि सुलक्षणा नायक हे 3 माजी खेळाडू उपस्थित होते.
आज झालेल्या मुलाखतीच्या पहिल्या फेरीत गंभीरनं सध्या असलेले मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यानंतर प्रशिक्षक होण्यासाठी बीसीसीआयसमोर पाच अटी ठेवल्या आहेत. त्यामुळे गंभीरला आता बुधवारी दुसऱ्या फेरीची मुलाखत द्यावी लागणार असल्याचं मानलं जात आहे. त्यानंतर बीसीसीआय या महिन्याच्या शेवटी नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा करेल. गंभीरनं बीसीसीआयसमोर ठेवलेल्या अटींमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. बोर्डाने माजी क्रिकेटपटूच्या काही अटीही मान्य केल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं जात आहे.
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनं आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचा मेंटाॅर म्हणून आयपीएल ट्रॉफी जिंकली. गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरनं 2012 आणि 2024 मध्ये आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर आता आयपीएलच्या हंगामात केकेआरचा 10 वर्षांनंतर ट्रॉफीचा दुष्काळ संपवला.
महत्वाच्या बातम्या-
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर हारिस रौफनं दिली प्रतिक्रिया
विराट समोर शाहरुख-सलमान फिके; किंग कोहली भारतातील सर्वात माैल्यवान सेलिब्रिटी
IND vs AFG सामन्यात टाॅस जिंकणारा संघ जिंकेल सामना, माजी प्रशिक्षकानं केली भविष्यवाणी