न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ईशान किशन भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आला, पण स्वस्तात विकेट गमावली. खेळपट्टीव फलंदाजांसाठी अनुकूल नव्हती आणि दोन्ही संघातील एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. असे असले तरी, भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीर याने ईशान किशन याला आगामी सामन्यांसाठी एक महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. भविष्यास गंभीरने दिलेला सल्ला ईशानसाठी आणि एकंतरीत भारतीय संघासाठी फायद्याचा ठरू शकतो.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा दुसरा टी-20 सामना रविवारी (29 जानेवारी) लखनऊमध्ये खेळला गेला. उभय संघांतील हा सामना भारताने 6 विकेट्स राखून जिंकला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघ प्रथम गोलंदाजीसाठी आणि त्यांनी पाहुण्या न्यूझीलंड संघाला अवघ्या 99 धावांवर रोखले. प्रत्युत्तारत भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या ईशान किशन (Ishan Kishan) याने अवघ्या 19 धावा करून विकेट गमावली. परिणामी भारताला हा सामना जिंकण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. ईशान किशन बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघासाठी खेळत होता आणि त्याने या मालिकेत द्विशतक देखील ठोकले होते. पण न्यूझीलंडविरुद्ध मात्र त्याची बॅट खूपच शांत दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने ईशानला हा सल्ला दिला.
गौतम गंभीरच्या मते ईशान किशनने फिरकी गोलंदाजांविरोधात खेण्याचा अधिक सराव केला पाहिजे. या गोष्टीचा फायदा त्याला भविष्यात होईल. ईशानविषयी चर्चा सुरू असताना गंभीर म्हणाला, “जेव्हा मायकल ब्रेसवेल ईशान किशनला गोलंदाजी करण्यासाठी आला, तेव्हा स्पष्टपणे दिसत होते की, त्याला या फिरकीपटूसमोर खेळताना अडचणी येत होत्या. हे पाहून आश्चर्य वाटत होते, कारण बांगलादेशविरुद्ध त्याने ज्या पद्धतीने द्विशतक ठोकले होते आणि त्यानंतर तो सतत संघर्ष करत आहे. प्रत्येकाला आशा होती की, अशाप्रकारचे प्रदर्शन केल्यानंतर त्याचा आलेख सतत उंचावत राहील.”
“ईशान किशनला अजूनही फिरकी चेंडू खेळताना खूप मेहनत करावी लागत आहे. कारण विरोधक पहिल्या सहा षटकांमध्ये त्याच्याविरोधात फिरकी गोलंदाजी जास्त वापरली जाईल. तो वेगवान गोलंदाजांविरुद्ध चांगला खेळतो, पण जितक्या लवकर फिरकी गोलंदाजीविरुद्ध स्वतःचे प्रदर्शन सुधारेल, त्याच्यासाठी तितकेच चांगले असेल. खासकरून टी-20 फॉरमॅटमध्ये,” असे गंभीर पुढे म्हणाला. (Gautam Gambhir’s reaction to Ishan Kishan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हाईट बॉलमध्ये वॉर्नर-स्टॉयनिस, तर कसोटीत स्मिथ बनला प्लेअर ऑफ द ईयर, महिलांमध्ये बेथ मुनीने सर्वोत्तम
अहमदाबादमध्ये पोहोचताच टीम इंडियाचे जंगी स्वागत, पण ईशानने दिला पृथ्वीला त्रास; व्हिडिओ पाहाच