---Advertisement---

नीरजच्या सुवर्ण यशाचा उत्साह! “मेरे देश की धरती” गाण्यावर ७२ वर्षीय गावसकरांनी आनंदाने धरला ठेका

On: रविवार, ऑगस्ट 8, 2021 3:37 AM
---Advertisement---

टोकियो। भारताच्या नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी (७ ऑगस्ट) भालाफेक क्रीडाप्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत नीरज ८७.५८ मीटर भाला फेक करत अव्वल क्रमांक पटकवला. या विजयासह नीरजने १२१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला ट्रॅक अँड फील्डमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याने जेव्हा ही सुवर्णमयी कामगिरी केली, त्यानंतर त्याच्यावर भारतभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

विशेष म्हणजे त्याने जेव्हा ही अभूतपूर्व कामगिरी केली, तेव्हा भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होता. यावेळी कसोटी सामन्यासाठी कॉमेंट्री करणाऱ्या सुनील गावसकर नीरजच्या यशाच्या आनंदात जल्लोष करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही. त्यांचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की नीरजचे नाव सुवर्णपदकावर निश्चित होताच कॉमेंट्री पॅनलमधील सदस्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली. यामध्ये ७२ वर्षीय सुनील गावसकरही आहेत. गावसकर यांनी आनंदाने “मेरे देश की धरती” हे प्रसिद्ध हिंदी गाणे म्हणण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी हात उंचावून ठेकाही धरला. याचवेळी आशिष नेहरादेखील नाचताना दिसला.

नीरज चोप्राचे भालफेकमध्ये सुवर्णपदक
भालाफेकमध्ये नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमधलं भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक जिंकलं आहे.  त्याने ८७.५८ मीटर दूर भाला फेकून सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. जेव्हा नीरज टोकियोमध्ये फेकत होता, तेव्हा संपूर्ण भारत त्याच्याकडे आशेने पाहत होता. तब्बल १३ वर्षानंतरचं म्हणजे २००८ बीजिंग ऑलिम्पिकनंतरचं हे भारताचं पहिलंच सुवर्ण पदक आहे. २००८ साली बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने सुवर्णपदक जिंकले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

बुमराहचा “हा” शॉट पाहिलात का? इंग्लिश गोलंदाजही पडले बुचकळ्यात

जसप्रीत बुमराहची फलंदाजी विराट कोहलीसाठी ठरली डोकेदुखी; भारतीय कर्णधार होतोय प्रचंड ट्रोल

…म्हणून इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात चांगली कामगिरी करु शकलो, केएल राहुलचा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---