---Advertisement---

ठरलं तर! ख्रिस गेल खेळणार ‘या’ क्रमांकावर, प्रशिक्षक वासिम जाफरने केला खुलासा

On: सोमवार, एप्रिल 12, 2021 4:52 PM
---Advertisement---

आयपीएलमध्ये आज (१२ एप्रिल) पंजाब किंग्स व राजस्थान रॉयल्स आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघ या हंगामातील आपला पहिला सामना खेळतील. या सामन्यासाठी केएल राहुल नेतृत्व करत असलेल्या पंजाब किंग्सची फलंदाजी क्रमवारी कशी असेल याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली होती. मात्र, आता संघाचा फलंदाजी प्रशिक्षक वसिम जाफर याने स्वतः याबाबत माहिती दिली आहे.

अशी असेल पंजाबची बॅटिंग लाईनअप
आयपीएल २०२१ मध्ये सर्वांना पंजाब किंग्सकडून भरपूर अपेक्षा आहेत. संघाची फलंदाजी अत्यंत प्रभावशाली भासत आहे. अशा परिस्थितीत संघाची फलंदाजी क्रमवारी कशी असेल याबाबत अनेक समीक्षक आपली मते मांडत होते. या सर्व प्रश्नांवरून पंजाब किंग्सचा फलंदाजी प्रशिक्षक वसिम जाफरने पडदा हटवला आहे.

जाफर म्हणाला, “आमची सलामी जोडी केएल राहुल व मयंक अगरवाल यांनी मागील वर्षी जबरदस्त कामगिरी केली होती. ख्रिस गेलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत बऱ्याच धावा कुटलेल्या. तो त्याच्यासाठी एक वेगळा अनुभव होता. मात्र, गेल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आल्याने विरोधी संघावर दबाव राहतो. संघाचे फिरकीपटू व मधल्या षटकात गोलंदाजी करणारे गोलंदाज दडपणाखाली दिसतात.”

जाफर पुढे म्हणाला, “राहुल व मयंक यांनी सलामीवीर म्हणून मागील वर्षी धावांचा रतीब घातलेला. त्यामुळे मला नाही वाटत आम्ही यावर्षी काही वेगळे करण्याचा प्रयत्न करू. गेल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. आमची वरची फळी सर्वात स्फोटक आहे.”

यावर्षी दमदार कामगिरी करू
जाफर आयपीएलच्या चौदाव्या हंगामाविषयी बोलताना म्हणाला, “मागील वर्षी आम्ही संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळ केला. काही सामने आम्ही केवळ एक-दोन धावांच्या फरकाने हरलो. सुरुवातीला पराभूत झाल्यानंतर सलग पाच विजय मिळवणे, आत्मविश्वास वाढवते. या वर्षी आमचा संघ अधिक संतुलित असून, गोलंदाज मजबूत आहे.”

वासिम जाफर मागील वर्षीपासून पंजाब किंग्सचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहतो.

पंजाब किंग्सचा संघ-
केएल राहुल (कर्णधार), मयंक अगरवाल, ख्रिस गेल, मनदीप सिंग, प्रभसिमरन सिंघ, निकोलस पूरन, सरफराज खान, दीपक हुड्डा, मुरुगन अश्विन, रवि बिश्नोई, हरप्रीत बरार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, इशान पोरेल, दर्शन नळकांडे, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान, झाय रिचर्डसन, शाहरुख खान, रायले मेरेडिथ, मोइजेस हेनरिक्स, जलज सक्सेना, सौरभ कुमार, फॅबियन ऍलन व उत्कर्ष सिंग.

महत्त्वाच्या बातम्या –

प्रसिद्ध कृष्णाचा घातक बाऊन्सर जोराने लागला फलंदाजाच्या मानेवर अन्… बघा थरारक Video

आयपीएलमध्ये बटलरला मोडायचा आहे ‘हा’ विक्रम; त्यासाठी गेल, मॅक्यूलमसारख्या दिग्गजांना टाकावे लागेल मागे

केन विलियम्सनला KKR विरुद्ध का दिली नाही संधी? संघ प्रशिक्षकाने सांगितले कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---