---Advertisement---

झुंजार जर्मनीने उंचावला हॉकी विश्वचषक! गतविजेत्या बेल्जियमचा पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव

---Advertisement---

ओडिसा येथे आयोजित केलेल्या पुरुष हॉकी विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (29 जानेवारी) खेळला गेला. या अंतिम सामन्यात गतविजेत्या बेल्जियमचा पराभव करत जर्मनीने विजेतेपद पटकावले. पूर्ण वेळेत 3-3 अशी बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूट आउटमध्ये जर्मनीने 5-4 असा विजय मिळवला. जर्मनीचे हे तिसरे विश्वविजेतेपद आहे.

 

राऊरकेला येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळला गेला. या अंतिम सामन्यासाठी मैदान पूर्ण क्षमतेने भरले होते. बेल्जियमने गतविजेत्यांसारखा खेळ करत पहिल्याच क्वार्टरमध्ये सलग दोन गोल झळकावत निर्णायक आघाडी मिळवली. फ्लोरेंटने 10 व्या तर कोसेनने 11 व्या मिनिटाला गोल केले. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस जाता जाता जर्मनीसाठी वेलनने गोल करत पिछाडी कमी केली. त्यानंतर पिलेटने 41 व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली.

सामना बरोबरीत आल्यानंतर आणखी आक्रमकपणे पुढे गेला. 48 व्या मिनिटाला मॅट्स ग्रॅमबुशने जर्मनीला आघाडीवर नेले. जर्मनी विजेतेपदाकडे आगेकूच करत असताना सामना संपण्यास अवघा एक मिनिट शिल्लक असताना बेल्जियमसाठी टॉम बून याने तिसरा गोल करत बरोबरी साधली. त्यामुळे हा सामना शुटआऊटमध्ये गेला. ‌‌ त्यानंतर जर्मनीने संयम राखत शूट आउटमध्ये 5-4 असा विजय मिळवला. जर्मनीचे हे तिसरे विश्वचषक विजेतेपद आहे.

(Germany Won Hockey World Cup 2023 After Beating Germany In Shoot Out)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या सामन्यात भारताने गमावली नाणेफेक, टीम इंडियापुढे मालिका हातात ठेवण्याचे आव्हान 
U19 टी20 वर्ल्डकप: भारतीय मुली इतिहास रचण्याच्या नजीक; विश्वविजयासाठी केवळ 69 धावांचे आव्हान

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---