---Advertisement---

प्रेयसी नव्हे तर ‘हे’ माझं पहिलं प्रेम; ईशान किशनच्या खुलास्यावर गर्लफ्रेंड आदिती म्हणते…

On: शुक्रवार, एप्रिल 16, 2021 1:57 PM
---Advertisement---

मुंबई इंडियन्सचा यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन हा सोशल मीडियावर बर्‍यापैकी सक्रिय असतो. त्याने शेअर केलेल्या पोस्ट किंवा फोटोंमुळे तो सतत चर्चेत येत राहतो. नुकताच त्याने इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल मोठा गौप्यस्फोट केला असून त्यावर त्याची प्रेयसी आणि प्रसिद्ध मॉडेल आदिती हुंडियाने प्रतिक्रिया दिली आहे.

या पोस्टमध्ये त्याने स्वत:चा फोटो शेअर करत “वर्कआऊट करणे हे माझे पहिले प्रेम आहे. माझे लक्ष प्राप्त करण्यासाठी मी #OPPOband ची निवड करतो, जे मला सतत उत्साही आणि माझे स्वास्थ चांगले ठेवण्यात मदत करते.” असे लिहले आहे.

https://www.instagram.com/p/CNmorPqBCDB/?igshid=1fw6eebhikve8

त्याच्या या पोस्टवर आदिती हुंडियाने प्रतिक्रिया देताना ‘होय?’ असे लिहले आहे. यापुढे तिने हसण्याचा इमोजीही टाकला आहे.

Photo Courtesy: Instagram/@ishankishan23

याअगोदर खूप वेळा ईशान त्याची प्रेयसी आदिती हुंडियाबरोबर दिसला आहे. दोन वर्षांपूर्वी आदितीच्या वाढदिवशी ईशान किशनसोबतची तिची छायाचित्रे खूप व्हायरल झाली होती. तसेच मुंबई इंडियन्स संघाच्या काही सामन्यांमध्येही ती ईशान किशनला साथ देताना दिसली आहे. ईशान किशनने आतापर्यंत त्यांच्या नात्याबद्दल कोणतेही वक्तव्य केलेले नाही. परंतु या भारतीय क्रिकेटपटूच्या मैदानावरील कामगिरीविषयीच्या आदितीच्या पोस्टने त्यांचे नातेसंबंध जवळजवळ स्पष्ट केले आहेत.

जेव्हा ईशान किशनने आंतरराष्ट्रीय पदार्पण करून भारतीय संघाची कॅप मिळवली होती. तेव्हा अदितीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरती कॅप सेरेमनीचा व्हिडिओ शेअर केला होता.

आयपीएल २०२१ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्त्व करत असलेला ईशान किशन सध्या संघासोबत चेन्नईत आहे. मुंबई संघाने हंगामाची सुरुवात पराजयाने केली होती. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्यांना पहिल्याच सामन्यात २ विकेट्सने पराभूत केले होते. परंतु पुढील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला १० धावांनी चितपट करत मुंबईने हंगामातील पहिला विजय साजरा केला होता. त्यांचा आगामी सामना १७ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मिस्टर अँड मिसेस बुमराहच्या लग्नाला एक महिना पूर्ण; संजना म्हणते, ‘या’ गोष्टीची खूप आठवण येतेय

हार्दिकने शेअर केला लाडक्या लेकासोबतचा ‘क्यूट व्हिडिओ’, अनुष्काची प्रेमळ प्रतिक्रिया ठरली लक्षवेधी

इज्जत भी, पैसा भी! पहिल्या सामन्यातील ‘त्या’ प्रसंगाची काढली कसर; दिग्गजाकडून मॉरिसचं हटके कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---