---Advertisement---

इज्जत भी, पैसा भी! पहिल्या सामन्यातील ‘त्या’ प्रसंगाची काढली कसर; दिग्गजाकडून मॉरिसचं हटके कौतुक

On: शुक्रवार, एप्रिल 16, 2021 9:44 AM
---Advertisement---

राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुरुवारी (१५ एप्रिल) पार पडलेल्या सामन्यात ‘ख्रिस मॉरिस शो’ पाहायला मिळाला. दिल्ली कॅपिटल्स संघाने दिलेल्या १४८ धावांचा पाठलाग करताना आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मॉरिसने शेवटी येऊन षटकारांचा पाऊस पाडत राजस्थान रॉयल्स संघाला सामना जिंकवून दिला. ही खेळी पाहिल्यानंतर माजी भारतीय खेळाडू विरेंद्र सेहवागने हटके ट्विट करत त्याचे कौतुक केले आहे.

मॉरिसने या सामन्यात १८ चेंडूत ३६ धावांची महत्वाची खेळी केली. ही खेळी पाहून भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सेहवाग भलताच खुश झाला आहे. त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर मॉरिसचे २ फोटोज् शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याने पहिल्या सामन्यातील फोटो आणि दुसऱ्या सामन्यातील फोटो जोडला आहे.

पहिल्या सामन्यातील फोटोमध्ये तो निराश दिसून येत होता, जेव्हा कर्णधार संजू सॅमसनने त्याला स्ट्राईक दिली नव्हती. या फोटोवर त्याने लिहिले की, ‘पैसा मिळाला पण इज्जत मिळाली नाही.’ तर दुसरा फोटो दुसऱ्या सामन्यातील आहे, ज्या सामन्यात त्याने संघाला एकहाती विजय मिळवून दिला. त्या फोटोसमोर त्याने लिहिले आहे की, ‘याला म्हणतात इज्जत. इज्जत पण, पैसा पण. खूप चांगली खेळी केली मॉरिस.’

https://twitter.com/virendersehwag/status/1382754314066685952?s=20

राजस्थान रॉयल्सने ३ गडी राखून जिंकला सामना
दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ गडी गमावत १४७ धावा केल्या होत्या. यामध्ये कर्णधार रिषभ पंतला वगळता इतर फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. रिषभने ५१ धावांची खेळी केली, तर ललित यादवने २० धावांचे योगदान दिले. यासोबतच टॉम करनने २१ तर क्रिस वोक्सने १५ धावांचे योगदान दिले.

दिल्लीच्या १४८ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना देखील काही सुर गवसला नाही. संघातील मुख्य फलंदाज लवकर बाद होऊन माघारी परतले. डेविड मिलरने सर्वाधिक ६२ धावांची खेळी करत राजस्थान रॉयल्स संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. शेवटी ख्रिस मॉरिसने येऊन षटकारांचा पाऊस पाडला. त्याने १८ चेंडूत ३६ धावा आणि उनाडकटने ७ चेंडूत ११ धावा करून हा सामना राजस्थान रॉयल्स संघाला जिंकवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

RRvDC: ‘असे’ केले दिल्लीच्या फलंदाजांना बाद होण्यास प्रवृत्त; ‘सामनावीर’ जयदेव उनाडकटचा उलगडा

धोनी तो धोनीच! ‘माही’च्या स्टाईलमध्ये पंतचा फलंदाजाला यष्टीचीत करण्याचा प्रयत्न अन्.., बघा व्हिडिओ

पैसा वसूल! ख्रिस मॉरिसचा ‘नो लूक षटकार’, तोही रबाडाच्या चेंडूवर; एकदा Video पाहाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---