आयपीएल 2021 च्या सातव्या सामन्यात गुरूवार (15 एप्रिल) रोजी राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्स संघाला 3 गडी राखून पराभूत केले. परंतु या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने यष्टिरक्षण करताना मोठी चूक केली. त्याने राजस्थानचा संघ फलंदाजी करत असताना 18 व्या षटकांच्या सुरूवातीला टॉम करनच्या गोलंदाजीवर जयदेव उनाडकटला धावबाद करण्याची सुवर्णसंधी गमावली.
झाले असे की, टॉम करनने टाकलेल्या चेंडूवर ख्रिस मॉरिस फटका मारताच धाव घेण्यासाठी धावला. त्यासोबत त्याचा साथीदार जयदेव उनाडकटही दुसरी धाव घेण्यासाठी धावला. परंतु तो धाव घेताना घसरला. त्यावेळी रिषभ पंतकडे उनाडकटला धावबाद करण्याची सुवर्णसंधी होती. एका क्षणी पंत उनाडकटला धावबाद करणार असे वाटतही होते.
क्षेत्ररक्षकाने वेळ न गमावत त्रित चेंडू पकडून पंतकडे टाकला होता. यावेळी दुसरी धाव घेण्याच्या घाईत असलेला उनाडकट क्रिजवरील सीमारेषेच्याही बराच दूर होता. पंतने वेळेवर चेंडू पकडला आणि अगदी यष्टीरक्षक एमएस धोनीच्या अंदाजात चेंडू यष्टीला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु गडबडीत चेंडू निसटला आणि चेंडूऐवजी त्याच्या हाताने यष्टी उडवली. अर्थातच उनाडकटला जिवनदान मिळाले.
https://twitter.com/lodulalit001/status/1382753486442401794?s=20
या जिवनदानाचा फायदा घेत उनाडकटने ख्रिस मॉरिसला पुरेपुर साथ दिली. त्याने 7 चेंडूत नाबाद 11 धावा केल्या. दुसरीकडे ख्रिस मॉरिसच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर राजस्थानने 148 धावांचे लक्ष्य पार करून विजय मिळवला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून 4 षटकांत 15 धावा देऊन तीन बळी घेण्याची किमया करणाऱ्या आणि आपल्या छोटेखानी फलंदाजी खेळीसह विजयात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या जयदेव उनाडकटला ‘सामनावीर’ म्हणून गौरविण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
पैसा वसूल! ख्रिस मॉरिसचा ‘नो लूक षटकार’, तोही रबाडाच्या चेंडूवर; एकदा Video पाहाच
एका बाजूने विकेट्स जात असताना रिषभबरोबर अर्धशतकी भागिदारी करणारा ‘तो’ आहे तरी कोण? वाचा
सेलिब्रेशन तो बनता है! पंतला धावबाद करताच रियान परागचा भर मैदानात बिहू डान्स, व्हिडिओ व्हायरल