नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२१ च्या लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. यात भारतीय खेळाडूंसह परदेशी खेळाडूंचा देखील समावेश आहे. या लिलावात काही खेळाडूंवर १४ कोटींपेक्षा जास्त रक्कमेची बोली लावण्यात आली होती. यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने १४.२५ कोटी खर्च करून विकत घेतलेल्या ग्लेन मॅक्सवेलचा समावेश आहे. आता हाच मॅक्सवेल सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केला जात आहे.
सध्या ऑस्ट्रेलियन संघ टी -२० मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ ५३ धावांनी पराभूत झाला आहे. यादरम्यान मॅक्सवेल ५ चेंडू खेळत १ धाव करून माघारी परतला. त्यानंतर जणु सोशल मीडियावर मीम्सचे वादळच आले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत खेळत असलेले मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स आणि केन रिचर्ड्सन हे तिघेही येत्या आयपीएल २०२१ मध्ये आरसीबी संघाकडून खेळताना दिसणार आहेत. मॅक्सवेलसह डॅनियल आणि रिचर्डसन यांनाही खास कामगिरी करता आली नाही. अशातच यांच्या खराब कामगिरीमुळे मॅक्सवेलबरोबर त्यांनाही सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. आरसीबीने डॅनियल आणि रिचर्डसनला रीटेन केले होते.
RCB players in Today's Aus vs NZ match
Josh Philippe 2(3)
Maxwell 1(5)
Daniel Sams 4-0-40-2
Adam Zampa 3-0-20-0
Kane Richardson 4-0-42-0
Kyle Jamieson 3-0-32-1RCB fans: pic.twitter.com/TVGaq3aHFD
— Mysuru Memes (@MysuruMemes) February 22, 2021
Daniel Sams 4-0-40-2
K.Richardson 4-0-42-0
Josh Philippe 2(3)
Maxwell 1(5)RCB :: pic.twitter.com/Z9cJHHmkYW
— THUG 1 (@thug1one) February 22, 2021
Bad day for RCBians who played this match
Philippe: 2(3)
Maxwell: 1(5), 0-9(1)
Sams: 1(3), 2-40(4)
Zampa: 13*(8), 0-20(3)
K Richardson: 5(5), 0-42(4)
Jamieson: 1-32(3)— Virarsh (@Cheeku218) February 22, 2021
Daniel Sams and Kane Richardson got brutally smashed in death overs ☠️. Next is Kyle Jamieson.
RCB could be the first team to concede 300 in T20 cricket.
— Sai Krishna💫 (@SaiKingkohli) February 22, 2021
रिचर्डसनने या सामन्यात ४ षटक गोलंदाजी केली. यात त्याने ४२ धावा दिल्या आणि त्याला एकही गडी बाद करता आला नाही. तर दुसरीकडे डॅनियल सॅम्स याने ४ षटकात ४० धावा देत २ गडी बाद केले. ग्लेन मॅक्सवेल हा १ धाव करत माघारी परतला. मात्र आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिलेल्या न्यूझीलंडच्या डेवोन कोंन्वेने आपली क्षमता दाखवून दिली. त्याने ५९ चेंडूमध्ये नाबाद ९९ धावांची खेळी केली. यात त्याने १० चौकार आणि ३ षटकार लगावले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ धाकड फलंदाजांना रिलीज करुन तोंडघशी पडली आरसीबी, एकाने तर केलीत ४ शतके