नवी दिल्ली| ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आयपीएलच्या 13 व्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळत आहे. या हंगामात त्याने अद्यापही काही खास कामगिरी केलेली नाही. याबद्दल ‘माझ्या भूमिकेत बदल केल्यामुळे मी सातत्य राखू शकत नाही,’ असे त्याने सांगितले आहे.
इंग्लंडविरुद्ध केली होती शानदार खेळी
किंग्ज इलेव्हन पंजाबचा हा फलंदाज इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी केल्यानंतर आयपीएलमध्ये आला आहे. आयपीएलच्या आधी इंग्लंड दौर्यावर त्याने सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती आणि 90 चेंडूंत 108 धावांची खेळी साकारली होती आणि ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरीसह महत्वपूर्ण भागीदारी केली होती. यामुळेच ऑस्ट्रेलियाला निर्णायक सामन्यात विजय मिळवता आला होता आणि वनडे मालिकाही जिंकता आली होती.
आयपीएलमध्ये बदलते भूमिका
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलमधील खराब कामगिरीविषयी बोलताना तो म्हणाला की, “मी आयपीएलमधील आणि ऑस्ट्रेलियामधील कारकिर्दीची तुलना करणार नाही. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलो त्यामध्ये संघात माझी भूमिका स्पष्ट होती. मला हेही माहित होते की माझ्यासोबत फलंदाजी करणाऱ्या खेळाडूची काय भूमिका आहे. आयपीएलच्या सामन्यांमध्ये माझी भूमिका बहुधा बदलते. आयपीएलमध्ये अनेक संघ त्यांच्या संघात बरेच बदल करतात. ऑस्ट्रेलिया संघात अधिकाधिक सामन्यांमध्ये प्लेयिंग इलेव्हनमध्ये बदल होत नाही. त्यामुळे सर्वांना त्यांची भूमिका माहिती असते.”
अव्वल चार क्रमांकावर फलंदाजी करायची भूमिका
सध्याच्या हंगामात मॅक्सवेल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करीत आहे त्याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “माझी फलंदाजी अव्वल चार क्रमांकावर खेळण्यासाठी उपयुक्त आहे. जेव्हा तुम्ही आयपीएलसाठी वर्षातून फक्त दोन महिने एकत्र असता, तेव्हा आपल्यात बरेच बदल घडतात. आपल्याला संघात नेहमीच समतोल साधायचा असतो. स्पर्धेच्या सुरूवातीला जरी तुम्ही एखादा संघ निवडता तेव्हा तुम्हाला असे वाटते की संघ पाहिजे तितका संतुलित नाही.”
आयपीएलमधील मॅक्सवेलची कामगिरी
गेल्या वर्षी मानसिक आरोग्याच्या समस्यांपासून मुक्त झाल्यानंतर असे दिसते आहे की मॅक्सवेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. मात्र आयपीएलच्या कामगिरीबद्दल असे म्हणता येणार नाही, तो या हंगामात सात सामन्यांत 14.5 च्या सरासरीने 58 धावाच करू शकला आहे.
ऑस्ट्रेलियाकडून केलेल्या कामगिरीमुळे आयपीएलमध्ये मॅक्सवेलला नेहमीच मागणी असते. या हंगामात पंजाबने त्याला 10 कोटी 75 लाख लाख रुपयांत विकत घेतले.
महत्त्वाच्या बातम्या –
राफेल नदालचे फ्रेंच ओपन जिंकणे झाले महाकठीण, राजस्थानचा फिरकीपटू देणार फाईट
“धोनी अंपायरचाही कर्णधार”, वाईडचा निर्णय रोखल्याने चाहत्यांनी साधला निशाणा
चेन्नई एक्सप्रेस पुन्हा रुळावर, हैदराबाद विरुद्धच्या विजयासह गुणतालिकेत आली ‘या’ स्थानावर
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष: क्रिकेटचा गंभीर शिलेदार
IPL : पंजाबकडून शतक करणारे ३ खेळाडू, जे आज कोणाच्या लक्षातही नाहीत
स्वार्थी राजकारणामुळे देशाने गमावलेला अस्सल हिरा.! ७० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळलेले एकमेव खेळाडू