---Advertisement---

आरसीबीत सामील होताच चमकलं ‘मॅक्स’भाऊचं नशीब; मागील ३ वर्षात न जमलेला पराक्रम अवघ्या २ सामन्यात केला

On: गुरूवार, एप्रिल 15, 2021 7:17 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा महान अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आयपीएलमध्ये 3 वर्षांनंतर आणि 40 सामन्यांनंतर त्याच्या वैयक्तिक धावांचा दुष्काळ संपवला आहे. बुधवारी (14 एप्रिल) रोजी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कडून खेळताना त्याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले आहे.

या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन त्याने 41 चेंडूत पाच चौकार व तीन षटकारांच्या मदतीने 59 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याने हे आयपीएलमधील अर्धशतक 40 सामन्यानंतर केले आहे. 2017 ते 2020 दरम्यान त्याने एकूण 39 सामने खेळले होते. परंतु त्याला एकाही सामन्यात अर्धशतक झळकावता आले नव्हते.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या हंगामातील पहिल्या सामन्यातही त्याला अर्धशतक पूर्ण करता आले नव्हते. परंतु हैदराबादविरुद्ध ती कमी पूर्ण करत 3 वर्षांनंतर त्याने अर्धशतक केले आहे.

यापूर्वी 2016 मध्ये त्याने पंजाबकडून खेळताना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध अर्धशतक ठोकले होते. त्या सामन्यात त्याने 42 चेंडूत 68 धावा केल्या होत्या. परंतु यंदाच्या मोसमात आरसाबीकडून खेळताना त्याने पहिल्या दोन्ही सामन्यात चांगली कामगिरी करत या नकोशा कामगिरीवर खंड लावला आहे.

आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद दरम्यान खेळलेल्या या सामन्यात आरसीबीने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य ठेवले होते. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करीता उतरलेल्या आरसीबीने 20 षटकांत 8 बाद 149 धावा केल्या होत्या. बेंगळुरूकडून मॅक्सवेलच्या अर्धशतकाशिवाय कर्णधार विराट कोहलीने 29 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने 33 धावा केल्या होत्या.

आरसीबीला 149 धावांवरती रोखल्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला हैदराबादचा संघ कर्णधार डेविड वॉर्नर आणि मनीष पांडेच्या चांगल्या खेळीचा फायदा घेऊ शकला नाही. हैदराबादचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावत 143 धावा करून गारद झाला. यंदाच्या आयपीएल मोसमातील हैदराबादचा हा सलग दुसरा पराभव आहे, तर आरसीबीचा हा सलग दुसरा विजय आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आधीच हॉस्पिटलमध्ये जागेची कमी, त्यात सचिनने भरती होण्याची गरज नव्हती,’ महाराष्ट्राच्या मंत्र्यांचे धक्कादायक विधान

SRHच्या विकेट्स पडत होत्या अन् क्षणाक्षणाला कॅमेरा तिच्याकडे वळत होता, पाहा चर्चित ‘मिस्ट्री गर्ल’चे फोटो!

ताकद जगासमोर! विराटची दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी विस्डेनकडून निवड; सचिन, कपिल देव यांचाही गौरव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---