पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकणारा भारताचा स्टार ॲथलीट नीरज चोप्रासाठी 90 मीटरचा पल्ला पार करणे अजूनही मोठे आव्हान आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये नीरजने 89.94 मीटर भालाफेक केली होती, जी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात लांब फेक होती. पण 90 मीटरचे जादूई अंतर अजूनही त्यांच्यापासून फक्त 0.06 मीटर दूर आहे. अनेक प्रयत्न करूनही हे अंतर पार करता न आल्याने नीरजने आता हे आव्हान देवावर सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
नीरज चोप्रा बऱ्याचकाळापासून 90 मीटरच्या आव्हानाचा सामना करत आहे, परंतु पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये त्याचा एकमेव वैध थ्रो 89.45 मीटर होता, ज्यामुळे तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला. सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे ही नीरजसाठी अभिमानाची बाब आहे, मात्र पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या 92.97 मीटरच्या शानदार थ्रोने त्याला सुवर्णपदकापासून लांबच ठेवले.
मीडियाशी बोलताना नीरज चोप्रा म्हणाले- “आता मी हे देवावर सोडतो. मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत आणि आता मला माझ्या तयारीचे काय फळ मिळते ते पहायचे आहे. 90 मीटरबद्दल आधीच खूप चर्चा आहे. आता मी हे देवावर सोडतो पॅरिसमध्ये मला वाटले की हे घडू शकते आणि ते होऊ शकले नाही.
नीरज चोप्रा म्हणाले की, पुढच्या दोन-तीन स्पर्धांमध्ये मी माझा शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेन आणि त्याचा परिणाम काय होतो ते बघू. 13-14 सप्टेंबर रोजी ब्रुसेल्समध्ये झालेल्या डायमंड लीगनंतर नीरज त्याच्या पाठीच्या दुखापतीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेईल आणि शक्य असल्यास शस्त्रक्रिया देखील करणार आहे.
नीरज चोप्राने देखील जोर देत म्हणाला की त्याच्या दुखापतीमुळे त्याला कामगिरीत आणखी सुधारणा करता आले नाही. तो म्हणाला- “मला वाटले की मी थ्राोचा अंतर वाढवू शकलो असतो, पण माझ्या दुखापतीने मला थांबवले. माझी पात्रता आणि अंतिम थ्रो हे दोन्ही हंगामातील माझ्या सर्वोत्तम थ्रोपैकी एक होते. पण दुखापतीमुक्त झाल्यानंतर अंतर वाढवण्यासाठी मी पूर्णपणे सर्वोत्तपरी प्रयत्न करेन.
हेही वाचा-
किंग कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 वर्षे पूर्ण! पाहा ‘विराट’ कामगिरी
आली लहर केला कहर! आयुष बदोनीचा रिषभ पंतच्या संघाला दे धक्का
भुवनेश्वर कुमारने पत्नीचा वाढदिवस बनवला खास, दिले शानदार सरप्राईज; होतंय कौतुक!