---Advertisement---

T20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी टीम इंडियाला मोठा दिलासा! स्टार खेळाडूच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट समोर

On: बुधवार, जानेवारी 28, 2026 9:22 PM
---Advertisement---

टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सुरुवातीपूर्वी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय टीमचा स्टार अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या (Washington Sundar) फिटनेसबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सुंदरने ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये फलंदाजी प्रॅक्टिस सुरू केली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात सुंदर गंभीररित्या जखमी झाला होता. मात्र, सुंदरला पूर्णपणे फिट होण्यासाठी अजून थोडा वेळ लागू शकतो.

वॉशिंग्टन सुंदरच्या फिटनेसबाबत मोठा अपडेट मिळाली आहे. रिपोर्टनुसार, सुंदरने फलंदाजी प्रॅक्टिस सुरू केली आहे. रिपोर्टनुसार, सुंदरने सुमारे 30 मिनिटे फलंदाजी केली. मात्र, सुंदरच्या बरगड्यांमध्ये अजूनही थोडा ताठरपणा आहे, जो पूर्णपणे बरा होण्यासाठी थोडा वेळ लागेल. सुंदरबाबत भारतीय टीम मॅनेजमेंट कोणत्याही प्रकारची घाई करण्याच्या मूडमध्ये नाही. दरम्यान, सुंदर वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या सामन्यांपर्यंत फिट होऊ शकेल, याची शक्यता सध्या कमीच दिसत आहे.

न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेमध्ये धमाकेदार कामगिरी करणारा ईशान किशन दुखापतीमुळे चौथा टी-20 सामना खेळत नाहीये. कॅप्टन सूर्याने सांगितले आहे की, ईशानला ‘निगल’ (किरकोळ दुखापत) आहे. मात्र, ईशानची दुखापत किती गंभीर आहे, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

सूर्यकुमारने अक्षर पटेलच्या फिटनेसवरही अपडेट दिली आहे. सूर्याने सांगितले की, अक्षर अजूनही पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही आणि त्याला थोडा वेळ लागेल. अक्षर पहिल्या टी-20 मध्ये स्वतःच्याच बॉलिंगवर बॉल पकडण्याच्या प्रयत्नात जखमी झाला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---