विश्वचषक २०२३ मधील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघ शुभमन गिलला डेंगू झाल्यामुळे त्याच्या अनुपस्थित मैदानात उतरला होता. पण तो आता यामधून बाहेर आला आहे, आणि अहमदाबाद येथे भारतीय संघाशी जोडला गोला आहे. आनंदाची बाब म्हणजे पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या महामुकाबल्यासाठी त्याने मैदानात उतरुन सरावाला सुरुवात केली आहे. यावेळी संघातील सपोर्ट स्टापमधील काही सदस्य त्याच्याबरोबर होते.
विश्वचषक २०२३ अगोदरच त्याला डेंगूने घेरलं होतं, त्यामुळे तो पहिल्या दोन सामन्यांना मुकला होता. त्याच्यावर चेन्नई येथे बीसीसीआयच्या मेडिकल टिमच्या निरिक्षणाखाली उपचार केले गेले. शुभमन गिल (Shubhman Gill) गुरुवारी (14 ऑक्टोबर) अहमदाबाद येथे पोहचला असून त्याने सरावालाही सुरुवात केली आहे. यामध्ये त्याने जवळजवळ एक तास सराव केला. त्यावेळी त्याला कोणताही त्रास जाणवला नाही. काही वेळ क्षेत्ररक्षणही केले.
गिलचं पुनरागमन भारतासाठी खुप महत्वाचं आहे, कारण १४ ऑक्टोबरला भारताचा सामना प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी अहमदाबाद येथे होणार आहे. त्यामुळे गिलचं संघात असणं भारतासाठी महत्वाचं आहे. त्याचा नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रेकॉर्ड सर्वात चांगला आहे. विश्वचषक २०२३ मधील पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ६ विकेट्सने, तर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला ८ विकेट्सने नमवत गुणतालिकेत दुसरा क्रमांक गाठला आहे. या दोन्ही सामन्यात सर्वच खेळाडूंनी महत्वपुर्ण योगदान दिलं आहे. (Good news Shubman Gill will play against Pakistan Practice also started)
महत्वाच्या बातम्या –
NZ vs BAG । वर्ल्डकपमध्ये सहाव्यांदा भिडणार न्यूझीलंड-बांगलादेश, जाणून घ्या दोन्ही टीमची कामगिरी
‘रोहित रिस्क घेऊन खेळतो, म्हणूनच तो…’, भारतीय दिग्गजाचे ‘हिटमॅन’विषयी लक्षवेधी भाष्य