मँचेस्टर। 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकात रविवारी(16 जून) 22 वा सामना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पार पडला. या सामन्यात भारताने 89 धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयात सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला.
रोहितने या सामन्यात 113 चेंडूत 140 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 3 षटकार मारले. रोहितचे हे वनडे क्रिकेटमधील 24 वे शतक आहे. अनेकांना रोहित या सामन्यात त्याचे चौथे वनडे द्विशतक करेल असे वाटले होते. पंरतू तो हसन अलीच्या गोलंदाजीवर 140 धावांवर बाद झाला.
या सामन्यानंतर रोहितला द्विशतकाबद्दल विचारण्यात आले. पण त्याने द्विशतकाबद्दल विचार करत नसल्याचे सांगितले आहे.
रोहित म्हणाला, ‘मी ज्याप्रकारे बाद झालो त्यामुळे मी नाराज आहे. विशेषत: जसा मी तो शॉट खेळला. सर्फराजने मिड-ऑनचा क्षेत्ररक्षकाला मागे पाठवले आणि फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला पुढे बोलावले. त्यामुळे माझ्याकडून क्षेत्ररक्षण समजायला चूक झाली. जेव्हा तूम्ही स्थिरावले असता तेव्हा तूम्ही शक्य असेल तेवढे जास्त धावा करण्याचा प्रयत्न करता.’
‘विश्वास ठेवा, मी द्विशतकाचा विचार करत नव्हतो. मी चूकीच्या वेळेला बाद झालो. आमची(विराट आणि रोहितची) भागीदारी भक्कम होत होती आणि आम्हाला शेवटपर्यंत लय कायम ठेवायची होती.’
रोहितने या सामन्यात शिखर धवनच्या अनुपस्थितीत केएल राहुलबरोबर सलामीला फलंदाजी केली. या दोघांनी मिळून सलामीला 136 धावांची भागीदारी केली. पण राहुल 57 धावा करुन बाद झाला. त्यानंतर रोहितने विराट कोहलीबरोबर 98 धावांची भागीदारी रचली. विराटने 77 धावांची अर्धशतकी खेळी केली.
पुढे रोहित राहुलच्या फलंदाजीबद्दल म्हणाला, ‘रोहुल मस्त खेळला. त्याने सुरुवातीला थोडा वेळ घेतला. कदाचित त्या वेळेची त्याला गरज होती. कारण फलंदाजीला आल्यानंतर थेट काही फटके खेळू शकत नाही. विचार असा होता की काय होत आहे हे आधी पहायचे. आम्हाला चांगली सुरुवात मिळाली आणि त्यातून आम्ही चांगली भागीदारी केली.’
त्याचबरोबर रोहितने म्हटले आहे की संघ म्हणून आम्ही ज्याप्रमाणे खेळलो त्याबद्दल आनंद वाटत आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–मॅचच्या आधी ७ तास पाकिस्तानचे खेळाडू करत होते पार्टी, व्हिडिओ झाला व्हायरल
–टॉप १०: पाकिस्तान विरुद्ध अर्धशतकी खेळीबरोबच किंग कोहलीने केले हे १० खास पराक्रम
–विराट कोहली, एमएस धोनी झाले दस नंबरी…