भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली याला पाहण्यासाठी चाहते आवर्जून टीव्हीचे बटल चालू करतात. इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज ग्रीम स्वान यानेही गोष्ट मान्य केली आहे की, विराट चांगला खेळला, तर टीव्हीवर सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढते. यावेळी त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याचाही उल्लेख केला. स्वानला असेही वाटते की, विराटने आगामी टी-20 विश्वचषकात चांगले प्रदर्शन केले पाहिजे.
यावर्षीचा आयसीसी टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केला गेला आहे. 16 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होत असून भारताला पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी खेळायचा आहे. पहिल्या सामन्यात भारतासमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचे आव्हान असेल. ग्रीम स्वान (Graeme Swann) याच्या मते विराट कोहली (Virat Kohli) जर या विश्वचषकात चांगला खेळला, तर टीव्ही रेटिंग देखील वाढेल. तसेही विराट आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे दिसले आहे.
माध्यमांशी बोलताना स्वान म्हणाला की, “भारतीय संघाला विराटकडून चांगल्या प्रदर्शनची अपेक्षा आहे. मी टेलिविजनसाठी काम केले आहे आणि मला माहिती आहे की, विराटने चांगले प्रदर्शन करणे किती गरजेचे असते. एमएस धोनी (MS Dhoni) सोबत देखील असेच असते. जेव्हा हे खेळाडू चांगले प्रदर्शन करत नाही, तेव्हा टीव्ही रेटिंग खाली पडले आणि लोकांना सामना पाहायला आवडत नाही.”
“मला वाटते विराट कोहलीने चांगले प्रदर्शन केले पाहिजे. जेव्हा मी भारताविरुद्ध खेळायचो, तेव्हा मी कधीच विराट कोहलीच्या फलंदाजीकडे दुर्लक्ष केले नाही. त्याला जवळून फलंदाजी करताना पाहायला मला आवडते. माझ्यावर विश्वास ठेवा, जर तुम्हाला टिव्ही किंवा स्टॅटमधून विराटची फलंदाजी चांगली वाटत असेल, तर तुम्ही एकदा बॅकवर्ड पॉइंट किंवा कवरमध्ये उभा राहुन देखील पाहिले पाहिजे. त्याला फलंदाजी करताना पाहणे अप्रतिम असते,” असे विराट पुढे बोलताना म्हणाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विश्वचषकापर्यंत टीम इंडियाला नाही आरामाचाही वेळ! पाहा भरगच्च वेळापत्रक
‘रोहित वर्ल्डकपमध्ये शतक ठोकणार’; चक्क इंग्लंडच्या खेळाडूने केली भविष्यवाणी