भारताचा दुसरा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या संघामध्ये श्रेयस अय्यरची निवड झाली नाही. त्याचे कारण म्हणजे अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. इंग्लंडविरुद्ध मालिकेमध्ये श्रेयसला खांद्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळेच आयपीएल 2021 मध्ये खेळू शकला नव्हता. त्यामुळे श्रेयस अय्यर सध्या क्रिकेटपासून लांब आहे. तरीदेखील तो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी जोडलेला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर आपल्या नव्या लूकमधील फोटो पोस्ट केला आहे.
भारतीय संघाचा फलंदाज अय्यरचा नवीन लुक सर्वांसमोर आला आहे. त्याने आपल्या केसांना पांढरा शेड दिला आहे आणि केस उभे केले आहेत. त्याने आपल्या चाहत्यांसाठी मंगळवारी (२९ जून) सोशल मीडियावर नवीन लूकचा फोटो शेअर केला आहे. तो या नवीन हेअर स्टाईलमध्ये खूप छान दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CQsytcoJpFs/?utm_medium=copy_link
यापुर्वी श्रेयसने आपल्या बहिणीसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओत त्यांनी एके अनोखे चॅलेंज स्विकारले होते. तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
https://www.instagram.com/reel/CQit262Dvoo/?utm_medium=copy_link
भारतीय संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. विश्वचषक 2019 मध्ये चौथ्या स्थानासाठी योग्य खेळाडू न मिळाल्यामुळे भारताला अडचणींचा सामना करावा लागला. परंतु आता श्रेयसने ती कमी भरून काढली आहे. तो असा खेळाडू आहे जो वेगवान धावांसह कठीण काळात उत्कृष्ट खेळण्यातही सक्षम आहे.
आयपीएल 2021 च्या हंगामाच दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयसच्या गैरहजेरीमध्ये रिषभ पंतकडे नेतृत्वपद सोपवले गेले आहे. आयपीएल 2021 चे उर्वरित सामने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहेत. हे सामने सुरु होण्याअगोदर श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये पुनरागमन करेल अशी सर्वांना आशा आहे. गतवर्षी त्याच्या नेतृत्त्वाखाली दिल्ली संघ उपविजेता राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ओहो… क्या बात है! पराभवाची पर्वा न करत किंग कोहली अनुष्कासोबत लुटतोय ‘या’ गोष्टीचा आनंद
अजबच! WTC फायनलचं टेंशन घेऊन चक्क बाथरुममध्ये लपला होता जेमिसन, वाचा मजेदार किस्सा
अरेरे! २४ वर्षीय क्रिकेटपटूचं फुटकं नशीब, बड्डे दिवशी पदार्पण केलं; पण शून्यावर तंबूत परतला