ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी इंग्लंडचा उदयोन्मुख स्टार फलंदाज हॅरी ब्रुकची तुलना चक्क महान सचिन तेंडुलकरशी केली आहे. त्यांनी हॅरी ब्रुकच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या दमदार सुरुवातीचं कौतुक केलं. ब्रूकचा सुरुवातीचा प्रभाव त्याच पातळीवरील तेंडुलकरपेक्षा जास्त होता, असं त्यांचं मत आहे.
ग्रेग चॅपेल यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्डसाठीच्या त्यांच्या कॉलममध्ये लिहिलं की, “हॅरी ब्रुक हा एक उदयोन्मुख फलंदाज आहे ज्याच्या कामगिरीची आणि दृष्टिकोनाची तुलना मी महान सचिन तेंडुलकरशी करतो. जर आपण ब्रुकच्या सुरुवातीच्या कारकिर्दीची आकडेवारी पाहिली, तर आपल्याला दिसून येईल की त्यानं त्या पातळीवरील प्रभावाच्या बाबतीत भारतीय दिग्गजाला मागे टाकलं असेल.”
हॅरी ब्रुकनं 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केलं. तेव्हापासून त्यानं 24 सामन्यांमध्ये 2281 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 58.48 आहे. ब्रूकनं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं होतं. चॅपेल म्हणाले की, जर आपण दोन्ही फलंदाजांच्या पहिल्या 15 कसोटी सामन्यांची तुलना केली, तर सचिननं 40 च्या सरासरीनं 837 धावा केल्या होत्या. तर ब्रूकनं 60च्या सरासरीनं 1378 धावा केल्या आहेत. सचिन तेव्हा खूपच तरुण होता, तर ब्रूक २० वर्षांचा आहे”.
ग्रेग चॅपेल यांनी हॅरी ब्रुकच्या दृष्टिकोनाचंही कौतुक केलं. सचिनकडे गोलंदाजांच्या गतीचा फायदा घेण्याची प्रतिभा होती, ज्यामुळे तो विकेटच्या दोन्ही बाजूंनी भरपूर धावा काढू शकला. ब्रुक हा शारीरिकदृष्ट्या अधिक शक्तिशाली खेळाडू आहे. त्याच्याकडे कोणत्याही फिल्डिंगला भेदण्याची क्षमता आहे.” हॅरी ब्रुक सध्या कसोटी फलंदाजांच्या रँकिंगमध्ये जो रुट नंतर दुसऱ्या स्थानी आहे.
हेही वाचा –
विजय हजारे ट्रॉफीमध्ये भारतीय गोलंदाजाचा धुमाकूळ! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळेल का?
विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये शतक, ऑस्ट्रेलियात एकाच सामन्यात मिळाली होती संधी
न्यूझीलंडच्या खेळाडूने घेतला सूर्यकुमार यादवसारखाच झेल, टी20 वर्ल्ड कपच्या आठवणी ताज्या, पाहा VIDEO