---Advertisement---

स्टेडियममध्ये बसून क्रिकेट पाहणे महागले, GST 2.0मुळे आयपीएल तिकिटांचे दर आसमानात

On: गुरूवार, सप्टेंबर 4, 2025 1:05 PM
---Advertisement---

भारत सरकारने जाहीर केलेल्या जीएसटी 2.0 मुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्या असल्या तरी क्रिकेटप्रेमींना मात्र मोठा फटका बसला आहे. आयपीएल सामने स्टेडियममध्ये बसून पाहणे आता अधिक महाग होणार आहे. कारण या तिकिटांना लक्झरी श्रेणीत समाविष्ट करत सरकारने यावर थेट 40 टक्के जीएसटी लावला आहे. याशिवाय काही राज्यांमध्ये वेगळा एंटरटेनमेंट टॅक्स असल्यामुळे चाहत्यांना एकूण 65 टक्क्यांपर्यंत कर भरावा लागू शकतो.

आतापर्यंत आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धांच्या तिकिटांवर 28 टक्के जीएसटी आकारला जात होता. पण जीएसटी 2.0 अंतर्गत हा दर 40 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. या नव्या स्लॅबमध्ये कॅसिनो, रेस क्लब आणि इतर लक्झरी वस्तूंचा समावेश आहे. यामुळे तिकिटांची किंमत आपोआप वाढणार असून त्याचा थेट परिणाम प्रेक्षकांच्या खिशावर होणार आहे.

उदाहरण द्यायचे झाले, तर आधी 1000 रुपयांच्या आयपीएल तिकिटासाठी 1280 रुपये मोजावे लागत होते. आता त्याच तिकिटासाठी 1400 रुपये खर्च करावे लागणार आहेत. स्टेडियम व्यवस्थापन, बीसीसीआय आणि फ्रँचायझी आपली कमाई कमी करायला तयार नसल्यामुळे हा भार थेट प्रेक्षकांवर पडणार आहे.

22 सप्टेंबरपासून नवे करस्लॅब लागू होणार असून आयपीएल 2026 पासून तिकिटांवर 40 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. याशिवाय तमिळनाडूसारख्या काही राज्यांत बेसिक प्राइसवर 25 टक्के एंटरटेनमेंट टॅक्स असल्यामुळे तिकिटांच्या दरात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे आता 500 रुपयांचे तिकीट 700 रुपयांना मिळेल.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या तिकिटांवर मात्र 18 टक्के जीएसटीच लागू राहणार आहे. मात्र आयपीएलसारख्या देशांतर्गत लीग सामने पाहण्यासाठी चाहत्यांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---