इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2024 स्पर्धेतील 24वा सामना काल (दि. 10 एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. अत्यंत अटितटीच्या झालेल्या या सामन्यात शेवटच्या चेंडूवर गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल्सवर विजय प्राप्त केला. यासह गुजरातने यंदाच्या आयपीएलमध्ये सुसाट धावत असलेला राजस्थान संघाचा विजयरथ रोखला आहे. कर्णधार शुबमन गिल, अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतिया आणि रशीद खान हे गुजरातच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. ( GT beat RR GT won by 3 wickets with 0 balls remaining ipl 2024 )
सर्वात आधी गुजरातने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. गुजरात संघाने हा निर्णय अयोग्य घेतल्याचे सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये दिसून आले. कारण गुजरातच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्स संघाने 196 धावांचा डोंगर उभा केला होता. यात रियान परागच्या वादळी अर्धशतकाचा तर संजू सॅमसनच्या संयमी अर्धशतकाचा समावेश होता.
त्याच्या बदल्यात गुजरात संघाची सुरुवात मात्र सौम्य झाली. परंतू 4 षटकांनंतर गुजरातने गियर बदलला. गुजरातचे दोन्ही सलामीवीर राजस्थानच्या गोलंदाजांवर तुटून पडले. हाहा म्हणता सामना गुजरातच्या बाजूने झुकल्याचे दिसले. परंतू राजस्थानच्या स्पीनरने सामन्याला कलाटणी दिली. य़ुझवेेंद्र चहल आणि कुलदीप सेन यांनी एकूण 5 बळी घेत सामना पुन्हा राजस्थानच्या बाजून झुकवला. परंतू राहुल तेवतियाच्या आक्रमक फलंदाजीने आणि रशीदच्या नाबाद 24 खेळीने गुजरातने शेवटच्या चेंडूवर शानदार विजय मिळवला.
𝘾𝙧𝙞𝙨𝙞𝙨 𝙈𝙖𝙣 delivered yet again 😎
🎥 Relive the thrilling end to a thrilling @gujarat_titans win!
Recap the match on @starsportsindia & @Jiocinema 💻 📱#TATAIPL | #RRvGT pic.twitter.com/eXDDvpToZ0
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2024
अधिक वाचा –
– महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेचा लिलाव उत्साहात, सोलापूर रॉयल्सकडून नौशाद शेखला सर्वाधिक किंमत
– भारतात क्रिकेट म्हणजे धर्म! चाहत्यानं केली हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सची आरती, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
– आयपीएलमध्ये लागू होणार नवा नियम; कमकुवत टीमसाठी ट्रॉफी जिंकणे होणार आणखीनच अवघड