इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा पहिला क्वालिफायर सामना महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना मंगळवारी (दि. 23 मे) चेन्नईच्या चेपॉक म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून दोन्ही संघ थेट अंतिम सामन्यात एन्ट्री करण्याचा प्रयत्न करतील. या सामन्यापूर्वीच गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने मोठे भाष्य केले आहे. हार्दिक पंड्याने धोनीच्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) म्हणाला आहे की, तो नेहमीच एमएस धोनी (MS Dhoni) याचा चाहता बनून राहील. यासोबतच त्याने धोनीवर चिडणाऱ्या लोकांनाही म्हटलंय की, जर त्यांना माहीशी द्वेष करायचा असेल, तर त्यासाठी त्यांना राक्षस बनावे लागेल.
धोनीसाठी पंड्याचा मन जिंकणारा संदेश
खरं तर, गुजरात टायटन्स संघाने नुकतेच अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत पंड्या धोनीबाबत मन जिंकणारी गोष्ट बोलताना दिसत आहे. गुजरातने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “धोनी एक कर्णधार, लीडर आणि लिजेंड. धोनी एक भावना.”
यादरम्यान पंड्या म्हणाला की, “अनेक लोक विचार करतात की, एमएस धोनी हा खूप गंभीर व्यक्ती आहे. मात्र, माझ्यासाठी असे काहीच नाहीये. मी धोनी भाईसोबत खूप मजा-मस्ती करतो. यामध्ये काहीच शंका नाहीये की, मी खूप साऱ्या गोष्टी माही भाईकडून शिकल्या आहेत. त्यांच्याशी बोलू नाही, तर त्यांना पाहून मी स्वत:मध्ये सुधारणा केल्या आहेत. माझ्यासाठी ते मोठ्या भावासारखे आणि एका खऱ्या मित्रासारखे आहेत, ज्यांच्यासोबत मी कधीही चिल मूडमध्ये राहू शकतो.”
यासोबतच हार्दिक पंड्या याने माहीशी द्वेष करणाऱ्या लोकांना म्हटले की, “जर धोनीचा द्वेष करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला राक्षस बनावे लागेल.”
आमने-सामने कामगिरी
चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स (Chennai Super Kings vs Gujarat Titans) संघात आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेपासून ते आतापर्यंत 3 वेळा आमना-सामना झाला आहे. या तीन सामन्यांपैकी दोन सामने मागील हंगामात खेळले गेले होते. यामध्ये गुजरात संघाने बाजी मारली होती. तसेच, या हंगामात दोन्ही संघात एक सामना खेळला गेला होता, जो गुजरातने 5 विकेट्सने जिंकला. अशात दोन्ही संघांमध्ये गुजरात संघाचेच पारडे जड असल्याचे दिसत आहे. (gt skipper hardik pandya slapped ms dhoni haters read what he said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनी, हार्दिक, ईशान आणि कृणाल पंड्याने केली पार्टी? मुंबई प्लेऑफमध्ये पोहोचताच व्हिडिओ व्हायरल
आयपीएलमधील खराब कामगिरीने ‘या’ तिघांसाठी बंद झाली टीम इंडियाची दारे, पुनरागमन अशक्यच