अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुसळधार पावसामुळे आयपीएल 2024 चा 63 वा सामना रद्द करण्यात आला. हा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये खेेळला जाणार होता.
सामना रद्द झाल्यानंतर गुजरात टायटन्स हा स्पर्धेतून बाहेर पडणारा तिसरा संघ ठरला. मात्र स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतरही गुजरात टायटन्सनं आपल्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. संघानं मॅचच्या तिकीटधारकांना त्यांचे संपूर्ण पैसे वापस करण्याची घोषणा केली आहे.
गुजरातच्या टीमचे मुख्य संचालन अधिकारी कर्नल अरविंद सिंग म्हणाले, “पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटत आहे. परंतु, टायटन्स फॅन्सच्या प्रचंड पाठिंब्याचा आम्ही खूप सन्मान करतो. म्हणूनच आम्ही सर्व तिकीटधारकांना पूर्ण पैसे वापस देणार आहोत.”
तिकीटाचे पैसे परत मिळवण्यासाठी तुम्ही तुमची वैध तिकिटं सुरक्षित ठेवा. तिकीटधारकांना तिकीटाची संपूर्ण रक्कम परत केली जाईल. पेटीएम इनसाइडरद्वारे 14 मे रोजी ईमेल आणि व्हॉट्सॲपद्वारे माहिती शेअर केली जाईल. जरी पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही, तरी गुजरातच्या संघानं मैदानावर केलेल्या खास व्यवस्थेमुळे चाहत्यांचे पैसे वसूल झाले.
सामना रद्द झाल्यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल आणि संपूर्ण टीमनं स्टेडियममध्ये फेरफटका मारला आणि चाहत्यांचे आभार मानले. संघांच्या खराब हंगामातही चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल गुजरातच्या टीमनं त्यांच्या चाहत्यांचं आभार मानलं. यानंतर टीम मॅनेजमेंटनं रात्री नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजीही केली, ज्यामुळे केवळ मैदानच नाही तर संपूर्ण अहमदाबाद शहर उजळून निघालं होतं.
सामना वाहून गेल्यानंतर शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा संघ आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. हा सामना त्यांच्यासाठी करो किंवा मरो होता. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना जिंकून 14 गुणांचा टप्पा गाठण्याचा संघाचा प्रयत्न होता. मात्र आता ते होऊ शकणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकासाठी बांगलादेशच्या संघाची घोषणा, शाकिब नाही तर ‘या’ युवा खेळाडूकडे नेतृत्व
आयपीएलमधील ‘या’ संघांना बसला मोठा झटका ! प्लेऑफ आधीच अनेक खेळाडू मायदेशी परतले । IPL Updates