गेली २ वर्ष जगभरात कोरोनाने थैमान घातल्याचे पाहायला मिळाले होते. आता कोरोनातून जग पूर्णपणे बाहेर येणार इतक्यात दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमीक्रॉन‘चा रुग्ण मिळाला आहे, ज्याचे काही रुग्ण भारतात देखील आढळून आले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेत ओमीक्रॉनच्या रुग्णांची संख्या जरा जास्तच आहे. तरीदेखील भारतीय संघातील (indian team) खेळाडू वनडे आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India tour of South Africa) गेले आहेत. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की, तिथे स्थिती बिघडली तर भारतीय खेळाडूंचं काय होईल? याबाबत दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने भाष्य केले आहे.
आवश्यकता भासल्यास रुग्णालयात बेडची सुविधा
क्रिकेट दक्षिण आफ्रिकाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शूएब मांजरा यांनी म्हटले की, “जर कुठल्याही कारणास्तव भारतीय खेळाडूंना रुग्णालय किंवा बेडची आवश्यकता भासली तर त्याची सोय आम्ही करून देऊ. त्यासाठी आम्ही काही रुग्णालयांसोबत चर्चा देखील केली आहे.” दक्षिण आफ्रिकेसाठी ही मालिका आर्थिकदृष्टया खूप महत्वाची आहे. ज्यामुळे क्रिकेट दक्षिण आफ्रिका हवी ती सर्व खबरदारी घेण्यासाठी तयार आहे. (India vs South Africa)
सीमा बंद केल्यास भारतीय खेळाडूंना देशाबाहेर जाण्याची परवानगी मिळणार का?
तसेच शूएब मांजरा (shuaib manjra) यांनी म्हटले की, “जर भारतीय संघाला पुन्हा घरी पाठवण्याची वेळ आणि सीमा बंद असल्या तरीदेखील भारतीय संघाला देशाबाहेर पाठवण्याची अनुमती दिली जाईल. आमच्या सरकारने भारतीय संघाला मायदेशी पाठवण्यासाठी हिरवे कंदील दाखवले आहे. परंतु भारतीय संघाला लगेचच भारतात येऊ दिले जाईल की नाही याबाबत अजुनही काहीच स्पष्ट नाहीये.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “भारतीय संघाच्या सुरक्षितेसाठी आम्ही हवी ती खबरदारी घेतली आहे. परंतु त्यांना असुरक्षित वाटत असेल आणि त्यांना माघारी परतावं वाटत असेल. तर ते जाऊ शकतात. याबाबतीत कुठलीही बंधनं लादली जाणार नाहीत.”
हे वाचा :पुजारा-रहाणेला जुन्या रंगात आणण्यासाठी महागुरूने घेतली धोनीच्या ‘शागीर्द’ची मदत, व्हिडिओ व्हायरल
असे आहे भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक
कसोटी मालिका
पहिला कसोटी सामना: २६-३० डिसेंबर २०२१ (सेंच्युरियन)
दुसरा कसोटी सामना : ३-७ जानेवारी,२०२२ (जोहान्सबर्ग)
तिसरा कसोटी सामना: ११-१५ जानेवारी,२०२२ (केपटाऊन)
वनडे मालिका
पहिला वनडे सामना: १९ जानेवारी,२०२१ (पार्ल)
दुसरा वनडे सामना: २१ जानेवारी,२०२१ (पार्ल)
तिसरा वनडे सामना : २३ जानेवारी, २०२१( केप टाऊन)
महत्वाच्या बातम्या :
“कपिल देव यांची गोलंदाजी ॲक्शन कॉपी करण्यासाठी ६ महिने करावा लागला ४ तास सराव”
आर्चरच्या दुखापतीबाबत आले मोठे अपडेट; आयपीएलसाठी असणार का उपलब्ध? वाचा सविस्तर
झहीर म्हणतोय, “भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणात ‘ही’ कमतरता”
हे नक्की पाहा :