देशांतर्गत क्रिकेटमधील गुजरात संघाच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. गुजरात संघाचा उत्कृष्ट फलंदाज मनप्रीत जुनेजा याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे. तो ज्या संघासाठी खेळतो त्या गुजरात संघाच्या गुजरात क्रिकेट असोसिएशनने सोमवारी (१४ मार्च) त्याच्या निवृत्तीची माहिती दिली आहे.
गुजरात क्रिकेट असोसिएशनने (GCA) दिलेल्या माहितीनुसार मनप्रीत जुनेजा (Manpreet juneja) याने ९ मार्च रोजी बोर्डला निवृत्तीसाठी घेणार असल्याची माहिती दिली होती. जीसीएने सांगितले की, “गुजरात क्रिकेट असोसिएशन मनप्रीत जुनेजा उत्कृष्ट कारकिर्दीसाठी शुभेच्छा देत आहे. या फलंदाजाने ९ मार्चला क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती.”
मनप्रीत एक उजव्या हाताच फलंदाज होता, जो मध्यक्रमांत उत्कृष्ट प्रदर्शन करू शकत होता. तसेच चांगल्या प्रकारे ऑफ ब्रेक गोलंदाजीही करू शकत होता. गुजरात संघाव्यतिरित्क जुनेजा भारत ए आणि भारताच्या २३ वर्षाखालील संघासाठी खेळला आहे. तसेच आयपीएलमध्येही त्याला खेळताना पाहिले गेले आहे. दिल्ली डेयरडेविल्स (आत्ताचे नाव दिल्ली कॅपिटल्स) आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांसाठी मनप्रीत खेळला आहे.
मनप्रीतचा जन्म अहमदाबादमध्ये झाला असून वयाच्या ३१ व्या वर्षी त्याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मनप्रीतने ६९ प्रथम श्रेणी सामने खेळला, ज्यामध्ये त्याच्या नावावर ४२६५ धावा आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ९ शतके आणि २५ अर्धशतके आहेत. डिसेंबर २०११ मध्ये मनप्रीतने तामिळनाडूविरुद्ध गुजरात संघाकडून प्रथम श्रेणी पदार्पण केले आणि या सामन्यात नाबात २०१ धावा केल्या होत्या. आजही ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
गुजरात संघाने २०१६-१७ हंगामाची रणजी ट्रॉफी जिंकली होती. मनप्रीत जुनेजाने संघाला ही ट्रॉफी जिंकवून देण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्याव्यतिरिक्त जुनेजा त्या संघाचाही भाग होता, जेव्हा गुजरातने २०१५-१६ मध्ये विजय हजारे ट्रॉफी जिंकली. तसेच २०१३-१४ आणि २०१२-१३ मध्ये सय्यर मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली होती.
महत्वाच्या बातम्या –
कसोटी क्रिकेट @१४५! इंग्लंडने खेळले हजारहून अधिक सामने, तर ‘अशी’ राहिली भारताची कामगिरी
ना धोनी, ना कोणी; केवळ ‘यष्टीरक्षक’ रिषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये साधलाय ‘तो’ पराक्रम
कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी मैदानावर धावलेल्या फॅन्सबाबत मोठी अपडेट, पोलिसांनी केलीये कडक कारवाई