वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामात बुधवारी (8 मार्च) गुजरात जायंट्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा सामना खेळला गेला. स्पर्धेतील आपला पहिला विजय शोधत असलेल्या या दोन्ही संघातील या सामन्यात गुजरातने वेगवान सुरुवात केली. गुजरातची सलामीवीर सोफिया डंकली हिने 18 चेंडूवर अर्धशतक पूर्ण करत स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले.
🚨 Milestone Alert 🚨
FASTEST 5⃣0⃣ in the #TATAWPL! ⚡️ ⚡️@dunkleysophia brings up a stunning half-century in just 1⃣8⃣ balls! 👏 👏@GujaratGiants zoom to 64/1 after 6 overs.
Follow the match ▶️ https://t.co/QeECVTM7rl #GGvRCB pic.twitter.com/erZmQPxgdq
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 8, 2023
ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात गुजरातची कर्णधार स्नेह राणा हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मेगन शूटने सामन्यातील पहिले षटक निर्धाव टाकले. मात्र, दुसऱ्या षटकात सोफिया डंकली हिने एलिस पेरीला चौकार ठोकत सुरुवात केली. त्यानंतर तिने एक हाती आरसीबीच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. पुढील तीन षटकातच तिने संघाला 5 षटकात 59 अशी मजल मारून दिली. यादरम्यान तिने केवळ 18 चेंडूवर आपले अर्धशतक पूर्ण केले. हे स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. यामध्ये नऊ चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. बाद होण्यापूर्वी तिने 28 चेंडूवर 65 धावांची खेळी केली.
(Gujarat Giants Sophia Dunkly Hits Fastest Fifty In WPL 18 Balls Against RCB)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या ‘बिग बॉय’ने गाजवला पीएसएलचा पहिलाच सामना! रावळपिंडीत बॅटने आणले वादळ
टीम इंडियाला ‘ओव्हर कॉन्फिडन्ट’ म्हणताच भडकला कॅप्टन रोहित, शास्त्रींच्या ‘त्या’ वक्तव्याचा घेतला समाचार