अहमदाबाद| इंडियन प्रीमियर लीग २०२२ (आयपीएल)चा अंतिम सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर रात्री आठ वाजता खेळला जाणार आहे. राजस्थानचा संघ तब्बल १४ वर्षानंतर म्हणजे दीड दशकानंतर आयपीएलचा अंतिम सामना खेळणार आहे, तर गुजरात हा पहिलाच हंगाम खेळत आहे. हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात संघाविरुद्ध जिंकणे राजस्थानसाठी अवघड दिसत आहे.
एकतर हा सामना गुजरातच्या घरच्या मैदानावर आहे आणि हार्दिकची मागील काही आकडेवारी पाहिली तर गुजरात आयपीएलचा विजेता ठरू शकतो, असे दिसून येत आहे.
साल २०१५च्या हंगामातून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा हार्दिक मुंबई इंडियन्सकडून खेळला. यादरम्यान त्याने उत्तम कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिले आहे. त्याने मुंबईकडून चार आयपीएलचे अंतिम सामने खेळले. या चारही सामन्या मुंबई संघाने विजतेपद पटकावले आहे. यावरून त्याचे आयपीएलच्या अंतिम सामन्यात जिंकण्याची संधी १०० टक्के आहे. त्याचबरोबर त्याने आयपीएलमध्ये अष्टपैलू खेळी करत २०१६मध्ये भारतीय क्रिकेट संघातही प्रवेश केला होता.
मुंबईने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० असे चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. या चारही वेळेस हार्दिक मुंबईच्या संघाचा भाग होता.
दरम्यान, आयपीएल २०२२ हंगामात गुजरात संघाने हार्दिकच्या नेतृत्वाखाली आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्यांनी १४ पैकी १० साखळी सामने जिंकत गुणतालिकेत प्रथम स्थान काबीज केले. नंतर राजस्थान विरुद्ध झालेल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातने ७ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात हार्दिकने एक विकेट घेत फलंदाजी करताना नाबाद ४० धावा करत अष्टपैलू खेळी केली.
आतापर्यत झालेल्या आयपीएल हंगामापैकी ह्या हंगामातून हार्दिकच्या बॅटमधून चांगल्याच धावा बाहेर पडल्या आहेत. त्याने १४ सामन्यांत ४५.३०च्या सरासरीने चार अर्धशतकांच्या साहाय्याने ४५३ धावा केल्या आहेत. तर सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आठव्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण ४६ चौकार मारले आहेत.
हार्दिकने या आयपीएलमध्ये गोलंदाजी करत ५ विकेट्स पटकावल्या आहेत. यावरून फिटनेस त्याचा सुधारला असून त्याला गोलंदाजीतही लय सापडली आहे असे दिसून आले. तसेच त्याची भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याला आगामी घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या पाच टी२० सामन्यांसाठी संघात स्थान मिळाले आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2022 | जोस बटलरने पाडला षटकारांचा पाऊस, तर ‘या’ खेळाडूने मारला सर्वात लांब षटकार
गोलंदाजीसाठी ७ पर्याय ते फिनिशर्सची भरमार, ‘या’ ५ गोष्टी गुजरातला बनवू शकतात चॅम्पियन
IPL फायनलमध्ये राजस्थानसाठी बटलरची फलंदाजीच नाही, तर ‘या’ ५ गोष्टीही ठरू शकतात जमेची बाजू