आयपीएलनंतर जगातील दुसरी सर्वात श्रीमंत पुरुष टी20 लीग असलेल्या इंटरनॅशनल लीग टी20 स्पर्धेचा पहिला हंगाम रविवारी (12 फेब्रुवारी) समाप्त झाला. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गल्फ जायंट्स संघाने डेझर्ट वायपर्सचा सात गडी राखून पराभव करत विजेतेपद आपल्या नावे केले. अनुभवी ख्रिस लिन व कार्लोस ब्रेथवेट हे अंतिम सामन्याचे नायक ठरले.
https://twitter.com/ILT20Official/status/1624827945138388993?t=ILQ88FOIx5BBUChQB4YiGQ&s=19
प्रथमच आयोजित केल्या गेलेल्या या स्पर्धेत सहा संघांनी भाग घेतला होता. सर्व संघांवर मात करत हे दोन संघ अंतिम फेरीत पोहोचले होते. गल्फ जायंट्स संघाचा कर्णधार जेम्स विन्स याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ब्रेथवेट व ग्रॅंडहोम यांनी शानदार गोलंदाजी करत 8.3 षटकात 44 धावांवर पहिल्या चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर कर्णधार सॅम बिलिंग्स व वनिंदू हसरंगा यांनी भागीदारी करत संघाला पुढे नेले. बिलिंग्स 31 धावा करून बाद झाल्यानंतर हसरंगाने आक्रमक फटकेबाजी करत केवळ 21 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्याने 27 चेंडूंवर 55 धावा करत संघाला 8 बाद 146 पर्यंत नेले. ब्रेथवेटने 19 धावांत 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
या धावांचा पाठलाग करताना जायंट्स संघाला दोन धक्के लवकर बसले. ख्रिस लिन व गेरार्ड इरॅस्मसने 73 धावांची भागीदारी करत संघाला सामन्यात माघारी आणले. इरॅस्मस बाद झाल्यानंतर लिनने या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेल्या शिमरन हेटमायरला साथीला घेत संघाला विजय मिळवून दिला. लिनने नाबाद 72 धावा करून संघाच्या विजयात सर्वात मोठे योगदान दिले.
(Gulf Giants Won International League T20 After Beating Desert Vipers In Finals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इकडं रोहितने शतक ठोकलं अन् तिकडं पत्नीने डायरेक्ट केली ‘ही’ मागणी; म्हणाली, ‘प्लीज माझ्यासाठी…’
हार्दिक पुन्हा चढणार बोहल्यावर! व्हॅलेंटाईन डेला उदयपूरमध्ये रंगणार शाही विवाहसोहळा