भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील तीन सामने झाले असून आता चौथा आणि शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे होणार आहे. मात्र, त्याआधीच भारतीय संघाला मोठे धक्के मिळाले आहेत. भारताचा क्रिकेटपटू हनुमा विहारी या कसोटी सामन्यातून बाहेर पडला असल्याचे समोर येत आहे. महत्त्वाचे म्हणजे याआधीच अंगठ्याच्या दुखापतीमुळे अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा ब्रिस्बेन कसोटीतून बाहेर आहे. त्यात आता विहारी देखील या सामन्याला मुकणार आहे.
याबाबत बीसीसीआयच्या सुत्राने एका वृत्तसंस्थेला माहिती दिली की, विहारीची हॅमस्ट्रिंगची दुखापत जरी पहिल्या स्थराची असेल तरी त्याला चार आठवण्यांसाठी विश्रांती घ्यावी लागेल. त्यामुळे तो ब्रिस्बेन कसोटीच नाही तर इंग्लंडविरुद्ध मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेतील सामने देखील मुकण्याची शक्यता आहे.
विहारीला सोमवारी(११ जानेवारी) सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळताना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. असे असतानाही त्याने मैदानावरच उपचार घेत फलंदाजी केली होती. त्याने आर अश्विन सोबत केलेल्या अर्धशतकी भागादीरीमुळे भारताला हा सामना अनिर्णित राखण्यात आणि मालिकेतील आव्हान कायम राखण्यात यश आले होते.
जडेजा देखील दुखापतग्रस्त –
जडेजाला देखील सिडनी कसोटी खेळतानाच दुखापत झाली. त्याला मिशेल स्टार्कने टाकलेला एक बाऊंसर चेंडू लागला. त्यामुळे त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो देखील ब्रिस्बेन येथे शेवटचा कसोटी सामना खेळणार नाही.
शुक्रवारपासून सुरु होणार ब्रिस्बेन कसोटी –
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात होणारा चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर होणार असून या सामन्याला १५ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. हा या मालिकेतील निर्णायक सामना असेल कारण सध्या मालिकेत तीन सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघ ‘या’ एका अटीवर ब्रिस्बेन येथे कसोटी सामना खेळण्यात तयार
“शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करण्याची आमची रणनिती होती”