विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघाला २० दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टीचा कालावधी संपल्यानंतर भारतीय संघ पुन्हा एकदा सरावाचा श्रीगणेशा करणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा सोबत डावाची सुरुवात कोण करणार? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.
येत्या ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ इंग्लड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत रोहित शर्मासोबत शुबमन गिल डावाची सुरुवात करणार होता. परंतु त्याला गंभीर दुखापत झाली आहे. ज्यामुळे तो दोन महिने क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की, तो संपूर्ण कसोटी मालिकेला मुकू शकतो. त्यामुळे भारतीय संघ सलामीवीर फलंदाजाच्या शोधात आहे. रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी केएल राहुल आणि मयंक अगरवाल आणि हनुमा विहारी हे प्रबळ दावेदार आहेत. (hanuma vihari will open the innings with rohit sharma in test series against england reports )
भारतीय संघ व्यवस्थापनातील एका सूत्राने भारतीय संघाच्या नियोजनाबद्दल टाइम्स ऑफ इंडियाला म्हटले कि, “नवीन चेंडूविरूद्ध केएल राहुलची कामगिरी तितकी चांगली राहिली नाही. तो मद्यक्रमात चांगली फलंदाजी करू शकतो. तसेच हनुमा विहिरीने दाखवून दिले आहे कि, तो नवीन चेंडूही चांगल्याप्रकारे खेळून काढू शकतो.’ अर्थातच इंग्लंडविरुद्ध मयंक किंवा राहुल नव्हे तर विहारी रोहितचा सलामी जोडीदार असू शकतो.
शुबमन गिलची दुखापत भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. कारण तो विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्यात चांगलाच लयीत दिसून येत होता. भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामातील ही भारतीय संघाची पहिलीच मालिका असणार आहे. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेत विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
मॅच फिक्सिंगच्या आपोरात दोषी आढळले ‘हे’ २ क्रिकेटपटू, आयसीसीने ८ वर्षांसाठी केले बॅन
दुखापतीची आडकाठी; विश्वविजेता कर्णधार विलियम्सनची ‘या’ मोठ्या लीगमधून माघार